
पुणे : गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांच्यावर येथील टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात हल्ला करण्यात आला. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना चार-पाच तरुणांनी बापट यांना अडवून वाद घातला. त्यानंतर या तरुणांनी त्यांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातील एकाची ओळख पटली असून, संतोष चव्हाण असे त्याचे नाव आहे.
हल्लेखोर स्थानिक गणेश मंडळांशी संबंधित असल्याचे समजते. या घटनेमुळे पुणे शहरात संतापाची लाट पसरली असून राजकीय नेत्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निषेध केला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची त्वरित ओळख पटवून त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली आहे. विवेकी भूमिका मांडणाऱ्या नागरिकांना संरक्षण देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबतची मागणी त्यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










