
नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना आज ऑकलंडमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी २६० धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २० षटकांत केवळ १७२ धावाच करू शकला. त्यामुळे त्यांना ८७ धावांनी पराभव पत्करावा लागला.
न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्सने शतक झळकावून सामना गाजवला, तर जेकब डफीने ४ बळी घेतले. भारताने याआधीच मालिकेतील पहिले तीन सामने जिंकल्यामुळे मालिकेत अजूनही भारताचीच आघाडी कायम आहे.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २५९ धावा उभारल्या. ग्लेन फिलिप्सने १०७ धावा केल्या, तर मायकेल ब्रेसवेलने ६५ आणि फिन ॲलनने ३१ धावांचे योगदान दिले. भारताकडून मयंक यादवने ३ बळी घेतले. न्यूझीलंडने २० षटकांत ७ गडी गमावून २५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ केवळ १७२ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारतीय फलंदाजांपैकी कोणीही मोठी खेळी उभारू शकले नाही.
New Zealand win by 87 runs in Auckland. Our focus shifts to the 5th T20I in Hamilton on Sunday. Scorecard ▶️ https://t.co/fx264c9iLe #TeamIndia | #NZvIND https://t.co/mZccr7XMfl
— BCCI (@BCCI) October 30, 2026
भारत (प्लेइंग इलेव्हन)
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन)
फिन ॲलन, टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हन जेकब्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, ॲडम मिल्ने, जेकब डफी, मॅथ्यू फिशर
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








