LIVE UPDATES

सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाजी

रेटिंग कॅटेगरीत पटकावला प्रथम क्रमांक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 29, 2026 05:50 PM
views 28  views

सावंतवाडी : बेळगाव, कर्नाटक येथील लायन्स क्लब आणि लिओ क्लबने आयोजित केलेल्या सात लाख पंचवीस हजार रुपये पारितोषिके असलेल्या पहिल्या राष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकर याने दमदार कामगिरी केली. बाळकृष्णने रेटिंग कॅटेगरीत प्रथम क्रमांक पटकावला. 

भारतातील विविध राज्यातील सुमारे तीनशे तीस खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, चिदानंद रेडकर यांच्यासह प्रज्वल नार्वेकर आणि स्वरुप राऊळ या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.

बाळकृष्णला या स्पर्धेत दोन हजार पेक्षा अधिक रेटिंग असलेले चार स्पर्धक मिळाले. त्यापैकी आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे, फिडे मास्टर निरंजन नवलगुंद यांच्याशी बाळकृष्णने चांगली लढत दिली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दिक्षित याच्याविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला आणि केवल निर्गुण याचा पराभव केला.

यापूर्वी बाळकृष्णने मुंबई येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय महिला मास्टर पर्णाली धारीया हीचा पराभव करण्याचा पराक्रम केला. एका आंतरराष्ट्रीय मास्टरबरोबर डाव बरोबरीत सोडवणारा आणि एका आंतरराष्ट्रीय मास्टरचा पराभव करणारा बाळकृष्ण हा कोकणातील पहिला खेळाडू ठरला आहे.

बाळकृष्णने नऊ राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेसहा गुण केले आणि रेटिंग कॅटेगरीत पहिला क्रमांक पटकावला. त्याने अडतीस रेटिंग पाॅईंट्स मिळवले. बाळकृष्णला रोख रक्कम रु.दहा हजार, आकर्षक मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

तेरा वर्षीय स्वरुप राऊळ याने दोन आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर विजय मिळवून पाच गुण केले. तेरा वर्षीय चिदानंद रेडकर याने चार गुण आणि नऊ वर्षाचा प्रज्वल नार्वेकर याने तीन गुण केले. ब्लिट्ज रेटिंग स्पर्धेत बाळकृष्णने सहा, चिदानंदने पाच, प्रज्वल आणि स्वरुपने चार गुण केले.

चिदानंद, प्रज्वल आणि स्वरुप यांनी ब्लिट्ज रेटिंग मिळवले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि सरचिटणीस स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

विज्ञान संबोध परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे उत्तुंग यश
October 29, 2026
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सभेत स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून वाद
October 29, 2026
Sanketa Sawant and Sai Sawant, sisters who run Eagle Taekwondo Training Centre in Ratnagiri.
Ratnagiri News : दोन सख्ख्या बहिणी चालवतात तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र
October 29, 2026
Rare Maratha-era historical documents in Modi script discovered in Rajapur, Maharashtra.
Rajapur Historical Documents : दक्षिण कोकणाच्या मध्ययुगीन इतिहासाचे नवे पान उजेडात!
October 29, 2026
संबंधित बातम्या

View all

Sanketa Sawant and Sai Sawant, sisters who run Eagle Taekwondo Training Centre in Ratnagiri.
Ratnagiri News : दोन सख्ख्या बहिणी चालवतात तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र
October 29, 2026
WPL 2027 mini auction and complete squad list of all five women's teams
महिला प्रीमियर लीग २०२७ साठी पाचही संघ सज्ज; पाहा सर्व संघांची संपूर्ण खेळाडू यादी
October 29, 2026
Maharashtra Cricket Association member Rahul Shewale inspecting Sawantwadi Gymkhana Ground
Sawantwadi News : जिमखाना मैदान राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी उपनगराध्यक्षांचा पुढाकार
October 28, 2026
Indian para-athlete Neeraj Yadav, three-time Asian Para Games gold medalist
Para athletics India : भारताच्या सुवर्णपदक विजेत्या पॅरा-ॲथलीटचा दुर्दैवी अंत
October 28, 2026