LIVE UPDATES

आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल, लसिथ मलिंगासह 'या' दोन प्रशिक्षकांना रामराम

Mumbai Indians Coaching Changes 2027 : मुंबई इंडियन्सने आगामी सीझनपूर्वी श्रीलंकेचे माजी कर्णधार माहेला जयवर्धने यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 29, 2026 07:51 PM
views 63  views
 Lasith Malinga, Paras Mhambrey and Carl Hopkinson part ways with Mumbai Indians ahead of IPL 2027.

मुंबई : आयपीएल २०२७ च्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स (MI) आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल करत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून फ्रँचायझीने लसिथ मलिंगा, पारस म्हांम्ब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन या तीन प्रशिक्षकांना मुंबई इंडियन्सने रामराम ठोकला आहे. याबाबतची फ्रँचायझीने गुरुवारी ही घोषणा केली. 

श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा मुंबई इंडियन्समध्ये ११ वर्षे होता. तो २०१८ च्या हंगामात 'बॉलिंग मेंटॉर' म्हणून सपोर्ट स्टाफमध्ये सामील झाला होता. त्यानंतर २०२४ च्या आयपीएल हंगामापूर्वी त्याने शेन बाँडच्या जागी संघाचे 'फास्ट-बॉलिंग कोच' म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.

याबाबत फ्रँचायझीने म्हटले आहे, "मलिंगा मुंबई इंडियन्स कुटुंबाचा एक अविभाज्य भाग राहिला आहे आणि फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करण्यापासून ज्यामध्ये त्याने चार आयपीएल विजेतेपदे आणि २०११ च्या चॅम्पियन्स लीग टी २० विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. ते पुन्हा संघात मेंटॉर आणि प्रशिक्षक म्हणून परतण्यापर्यंत त्याचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास अत्यंत खास राहिला आहे. त्याची जिद्द, स्पर्धात्मक वृत्ती आणि संघाप्रती असलेली निष्ठा यांनी अनेक पिढ्यांतील खेळाडूंना प्रेरित केले आहे. त्याचा वारसा नेहमीच मुंबई इंडियन्सचा एक महत्त्वाचा भाग राहील."

विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सने आगामी सीझनपूर्वी श्रीलंकेचे माजी कर्णधार माहेला जयवर्धने यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलार्ड गेल्या काही हंगामांपासून संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होते. 

पोलार्डने २००९-२०१० पासून २०२२ मधील आपल्या शेवटच्या सामन्यापर्यंत आयपीएलमध्ये केवळ मुंबई इंडियन्ससाठीच खेळले. फ्रँचायझीसाठी खेळलेल्या १८९ आयपीएल सामन्यांमध्ये त्याने १४७.३२ च्या स्ट्राईक रेटने ३,४१२ धावा केल्या आणि ६९ बळी घेतले. मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांनी शेवटचे विजेतेपद २०२० मध्ये जिंकले होते.


ताजी बातमी

View all

Sindhudurg District Cooperative Bank election process postponed due to drought conditions.
Sindhudurg Bank Election Postponed : दुष्काळामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर
October 29, 2026
Devgad News : देवगड-नांदगाव मार्गावर विनापरवाना चिरे वाहतुकीला दणका
October 29, 2026
Maharashtra government postpones cooperative society elections amid drought conditions.
Maharashtra Cooperative Elections Postponed : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
October 29, 2026
‘सम्यक’तर्फे कथा, कविता स्पर्धा
October 29, 2026
संबंधित बातम्या

View all

Sanketa Sawant and Sai Sawant, sisters who run Eagle Taekwondo Training Centre in Ratnagiri.
Ratnagiri News : दोन सख्ख्या बहिणी चालवतात तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र
October 29, 2026
सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाजी
October 29, 2026
WPL 2027 mini auction and complete squad list of all five women's teams
महिला प्रीमियर लीग २०२७ साठी पाचही संघ सज्ज; पाहा सर्व संघांची संपूर्ण खेळाडू यादी
October 29, 2026
Maharashtra Cricket Association member Rahul Shewale inspecting Sawantwadi Gymkhana Ground
Sawantwadi News : जिमखाना मैदान राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी उपनगराध्यक्षांचा पुढाकार
October 28, 2026