
कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाने वडिलांनी गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून राहत्या घरी ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मयत तरुण युवराज हा त्याचे वडील विजय परब यांच्यासह राहत होता. घटना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०:३० ते ११:३० या मुदतीत घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत युवराज याने त्याच्या वडिलांकडे नवीन गाडीची मागणी केली होती. मात्र, वडिलांनी गाडी घेऊन न दिल्याच्या तीव्र रागातून त्याने राहत्या घरातील बेडरूममधील पंख्याला गळफास घेतला.
या प्रकरणी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे १:१९ वाजता कुडाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेची खबर मयताचे वडील विजय परब यांनी दिली असून, पुढील कायदेशीर नोंद मपोहेका/७० रेडकर यांनी केली आहे. या घटनेचा अधिक तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोहवा/४०५ भोई करीत आहेत.
अवघ्या १५ व्या वर्षी मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने परब कुटुंबीयांवर व परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








