LIVE UPDATES

देवगडच्या वाडातरमध्ये गोवा बनावटीच्या दारूवर एलसीबीचा छापा

एकावर गुन्हा दाखल : १२ हजारांचा मद्यसाठा जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 08:38 PM
views 60  views

देवगड : वाडातर येथे गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी संशयित विरेंद्र वासुदेव जाधव (५०, रा. वाडा मूळबांध) याच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वाडातर येथे छापा टाकला असता, कांबळी स्टोअरच्या बाजूला संशयित विरेंद्र जाधव याच्याकडे सुमारे १२ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. ही दारू बेकायदेशीररीत्या, कोणताही परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार अविनाश अर्जुन ओटवणेकर यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत करीत आहेत.


ताजी बातमी

View all

वडिलांनी गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
October 30, 2026
Ancient temple ruins and historical stone sculptures discovered in Dhamapur village of Sangameshwar, Ratnagiri.
Dhamapur Ancient Temple and Palace : रानवेलींच्या कुशीत विसावलेला चालुक्यकालीन इतिहास
October 30, 2026
Posco Act awareness campaign in Sindhudurg
बालकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्गात वर्षभर जनजागृती अभियान
October 30, 2026
कुडाळमध्ये महिला बचत गटांना शेतमाल व अन्न वाहतूक वाहनांचे वाटप
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

वडिलांनी गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
October 30, 2026
दिगवळेत दीड लाख किमतीच्या लोखंडी प्लेट्स चोरीस
October 30, 2026
सावंतवाडीत मोबाईलवरून कल्याण मटका जुगार चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
October 30, 2026
सावंतवाडी पोलिसांकडून संशयित महिला व पुरुषाचा शोध सुरू
October 30, 2026