LIVE UPDATES

दुसऱ्या वनडेवर पावसाचे सावट! सामना रद्द होण्याची शक्यता, आकाश चोप्रांच्या मते भारताची संभाव्य प्लेइंग ११

India vs New Zealand 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना वेलिंग्टनच्या 'बेसिन रिझर्व्ह' मैदानावर होणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनमध्ये हवामान अत्यंत खराब राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 06, 2026 05:36 PM
views 102  views
India vs New Zealand second ODI match in Wellington with rain threat and predicted Indian playing XI.

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आघाडी घेतल्यानंतर भारत शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे न्यूझीलंड संघ पुनरागमन करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

जरी भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडसारख्या संघाला विशेषतः त्यांच्या घरच्या मैदानावर केवळ एका पराभवानंतर कमकुवत समजणे चुकीचे ठरेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना वेलिंग्टनच्या 'बेसिन रिझर्व्ह' मैदानावर होणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनमध्ये हवामान अत्यंत खराब राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. परंतु त्याच वेळी पावसाला सुरुवात होऊन तो रात्रीपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे. अधूनमधून पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता असली तरी एकदिवसीय सामना पूर्ण होण्यासाठी ती पुरेशी नसेल. या सामन्यासाठी भारताचा अंतिम ११ खेळाडूंचा संघ कसा असेल याबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी आपला संभाव्य संघ जाहीर केला आहे.

आकाश चोप्रा यांच्या मते दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल. राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद सिराज किंवा कुलदीप यादव, गुरनूर ब्रार आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश असू शकतो.


ताजी बातमी

View all

मालवणमधील २०५ घरेलू कामगारांना दिवाळीची भेट
November 06, 2026
उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव जाधव यांना ‘आयडॉल शिक्षक सन्मान’
November 06, 2026
देवगडमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासूर स्पर्धा
November 06, 2026
स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार
November 06, 2026
संबंधित बातम्या

View all

India vs Sri Lanka 2026 cricket series first ODI venue shifted from Delhi to Visakhapatnam.
India vs Sri Lanka 2026 Schedule : भारत-श्रीलंका मालिकेबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय! पहिल्या वनडे सामन्याचे ठिकाण बदलले
November 06, 2026
Cristiano Ronaldo announces retirement from Portugal national football team after 23 years.
Cristiano Ronaldo Retirement : जगातील सर्वात महागड्या ॲथलीटचा फुटबॉलला अलविदा
November 06, 2026
Sawantwadi Taluka Kabaddi Association announces boys and girls kabaddi selection trials for the Sindhudurg District Championship 2026.
Sawantwadi Kabaddi Selection : सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
November 05, 2026
मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदूरकरची विभाग स्तरावर विक्रमी पाचव्यांदा निवड
November 05, 2026