
नवी दिल्ली : पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. रोनाल्डो हा पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्या देशासाठी सर्वाधिक २३४ सामने खेळण्याचा विक्रमही नोंदवला असून त्यात १४६ गोल केले आहेत. पोर्तुगालसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आणि सर्वाधिक काळ कर्णधारपद भूषवणारा खेळाडूच्या रुपात रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होत आहेत.
फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार रोनाल्डोची एकूण संपत्ती तब्बल 11,425 कोटीहून अधिक असून तो जगातील अवघ्या चार सक्रिय ॲथलीट्सपैकी एक आहे. गेल्या एका वर्षात त्याने 300 मिलियन डॉलर (सुमारे 2858 कोटी रुपये) इतकी थक्क करणारी कमाई केली.
गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ मॅसेजमध्ये रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. ४१ वर्षीय रोनाल्डो यांने सांगितले की, "पोर्तुगालच्या नागरिकांनो, आता वेळ आली आहे की मी आपल्या राष्ट्रीय संघाची 'क्रमांक ७' जर्सी परत करण्याची. मी ही जर्सी कधीही केवळ माझी स्वतःची मानली नाही उलट, २३ वर्षे ती परिधान करण्याचा, तिची प्रतिष्ठा जपण्याचा आणि जगभरातील स्टेडियमच्या मैदानांवर ती अभिमानाने मिरवण्याचा मान आणि जबाबदारी मला मिळाली होती."
२००३ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर त्याने २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर पाच फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभागी झाला. सलग सहा वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल केलेला रोनाल्डो इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात एकूण ११ गोल नोंदवणारा रोनाल्डो हा पोर्तुगालसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. तो पोर्तुगालचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आणि सर्वाधिक काळ कर्णधार राहिलेला खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








