LIVE UPDATES

Sawantwadi Kabaddi Selection : सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

सहभागी होण्याचे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 06:00 PM
views 16  views
Sawantwadi Taluka Kabaddi Association announces boys and girls kabaddi selection trials for the Sindhudurg District Championship 2026.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने आयोजित किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार ७ नोव्हेंबर २०२६ रोजी जामसंडे हायस्कूल, देवगड येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने शुक्रवार ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता वि. स. खांडेकर प्रशालेच्या मैदानावर तालुकास्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. 

सर्व शाळांच्या क्रीडा शिक्षकांनी तसेच कबड्डी मंडळांच्या व्यवस्थापकांनी प्रत्येकी २ किशोर व २ किशोरी खेळाडूंना या तालुकास्तरीय निवड चाचणीसाठी उपस्थित ठेवावे, असे आवाहन सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी तालुक्याचे दोन किशोर व दोन किशोरी संघ निवडण्यात येणार आहेत.

या निवड चाचणीसाठी खेळाडूंच्या वयोगट व वजन मर्यादा निश्चित करण्यात आल्या असून किशोर गटासाठी खेळाडूची जन्मतारीख १३ डिसेंबर २०१० किंवा त्यानंतरची असावी आणि वजन ६० किलोपेक्षा कमी असावे. तसेच किशोरी गटासाठी जन्मतारीख ३१ डिसेंबर २०१० किंवा त्यानंतरची असावी आणि वजन ५५ किलोपेक्षा कमी असावे.

खेळाडूंनी निवड चाचणीच्या वेळी स्वतःचे ओळखपत्र अद्ययावत स्वरूपात आणणे बंधनकारक असून, त्यावर जन्म तारीख, महिना व वर्ष स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. सोबतच ओळखपत्राची रंगीत छायांकित प्रत व मूळ प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. या जिल्हा निवड चाचणी व तालुकास्तरीय चाचणीबाबत अधिक माहितीसाठी अजय जाधव यांच्याशी ९८२२६८८४६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशन नोंदणी क्रमांक २९७७ कडून कळवण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

Parents protest over the teacher shortage at Kamalevir School in Sawantwadi, demanding a graduate teacher for nearly 100 students.
कामळेवीर शाळेतील शिक्षक नियुक्तीचे आश्वासन हवेतच
November 05, 2026
सावंतवाडी नगरपरिषदेचा यशस्वी उपक्रम
November 05, 2026
Sawantwadi Indira Gandhi Commercial Complex where 138 shopkeepers have outstanding premium payments and most have pending monthly rent.
Sawantwadi News :व्यापारी संकुलातील तब्बल 138 गाळेधारकांकडे प्रीमियम थकीत
November 05, 2026
AISSEE 2027 Sainik School entrance examination notification for admission to Class 6 and Class 9 for the 2027-28 academic year.
Sainik School Admission 2027 : सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदूरकरची विभाग स्तरावर विक्रमी पाचव्यांदा निवड
November 05, 2026
WPL 2027 Schedule
WPL 2027 : महिला प्रीमियर लीग २०२७ चे वेळापत्रक जाहीर
November 05, 2026
Mumbai Suburban men's and women's teams celebrate their victories at the Mumbai University Inter-Zonal Kabaddi Championship in Ratnagiri.
मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत मुंबई सबर्बनची महिला, पुरुषांच्या गटात बाजी
November 04, 2026
Ratnagiri athletes Dr Nitin Sangaonkar and Rahul Bhosale successfully complete the Goa Ironman 70.3 Triathlon in 7 hours and 2 minutes.
Goa Ironman 70.3 : गोवा आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉनमध्ये रत्नागिरीच्या दोन शिलेदारांची बाजी
November 04, 2026