LIVE UPDATES

मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदूरकरची विभाग स्तरावर विक्रमी पाचव्यांदा निवड

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 05:40 PM
views 18  views

सावंतवाडी : क्रिडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे ओरोस येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदूरकर हीने एकाग्रता, अचूकता आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. साक्षीची सतरा वर्षाखालील वयोगटात विभाग स्तरावर विक्रमी पाचव्यांदा निवड झाली आहे.

दहावीत शिकणा-या साक्षीने अभ्यासाबरोबरच कॅरम आणि बुदधिबळ या दोन्ही खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने हे निर्विवाद यश मिळवले आहे. सरांच्या मार्गदर्शनाबरोबरच साक्षीने अथक मेहनत आणि परीश्रम करुन राज्यस्तरीय शालेय स्पर्धा आणि असोसिएशनच्या राज्य स्तरावरील स्पर्धेत विक्रमी यश संपादन केले आहे.

साक्षीने पेडणेकर सरांनी घेतलेल्या परीश्रमाचे चीज करताना चौदाव्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत सतरा वर्षाखालील गटात राज्याचे उपविजेतेपद पटकावले आहे. सलग पाच वर्षे कॅरम आणि बुदधिबळ खेळांमध्ये विभाग स्तरावर निवड होणारी साक्षी रामदूरकर ही राज्यातील एकमेव खेळाडू ठरली आहे. साक्षीच्या या दैदीप्यमान कामगिरीने मुक्ताई ॲकेडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

साक्षीने आपल्या यशाचे सारे श्रेय कौस्तुभ पेडणेकर आणि मुक्ताई ॲकेडमीला दिले आहे. गेल्या दहा वर्षात श्री. पेडणेकर यांच्या मार्गदर्शनखाली राष्ट्रीय स्तरावर तीन मुलींची आणि राज्य स्तरावर सोळा मुलांची व मुलींची निवड झाली आहे. पेडणेकर सरांनी साक्षीचे कौतुक करतानाच ती एक गुणी आणि प्रतिभावान खेळाडू असून तीचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे म्हटले आहे. मुक्ताई ॲकेडमीच्या सचिव सौ.स्नेहा पेडणेकर आणि कोषाध्यक्ष बाळकृष्ण पेडणेकर यांनी साक्षीचे अभिनंदन करुन तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व स्तरातून साक्षीचे कौतुक करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

Sawantwadi Indira Gandhi Commercial Complex where 138 shopkeepers have outstanding premium payments and most have pending monthly rent.
Sawantwadi News :व्यापारी संकुलातील तब्बल 138 गाळेधारकांकडे प्रीमियम थकीत
November 05, 2026
AISSEE 2027 Sainik School entrance examination notification for admission to Class 6 and Class 9 for the 2027-28 academic year.
Sainik School Admission 2027 : सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
November 05, 2026
Sawantwadi Mayor Shraddharaje Bhosale celebrates Diwali with municipal employees and sanitation workers by distributing Diwali faral.
Sawantwadi Diwali Celebration : सफाई मित्रांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी
November 05, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News :अनधिकृत मासेविक्री करताना आढळल्यास कारवाई
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

WPL 2027 Schedule
WPL 2027 : महिला प्रीमियर लीग २०२७ चे वेळापत्रक जाहीर
November 05, 2026
Mumbai Suburban men's and women's teams celebrate their victories at the Mumbai University Inter-Zonal Kabaddi Championship in Ratnagiri.
मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत मुंबई सबर्बनची महिला, पुरुषांच्या गटात बाजी
November 04, 2026
Ratnagiri athletes Dr Nitin Sangaonkar and Rahul Bhosale successfully complete the Goa Ironman 70.3 Triathlon in 7 hours and 2 minutes.
Goa Ironman 70.3 : गोवा आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉनमध्ये रत्नागिरीच्या दोन शिलेदारांची बाजी
November 04, 2026
India vs New Zealand 1st ODI – Virat Kohli scores 74 runs in India's 5-wicket victory at Auckland.
पावसाच्या व्यत्ययानंतर भारताचा न्यूझीलंडवर ५ विकेट्सने दणदणीत विजय, विराट कोहलीची ७४ धावांची खेळी
November 04, 2026