
नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. दिल्लीत नियोजित सामना आता विशाखापट्टणम येथे खेळवला जाईल. बीसीसीआयने या बदलाची घोषणा केली. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार असून श्रीलंकेचा संघ आपल्या दौऱ्याची सुरुवात १३ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याने करेल.
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना सुरुवातीला दिल्लीत होणार होता परंतु 'दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन'च्या विनंतीनंतर बीसीसीआयने हे ठिकाण बदलून विशाखापट्टणम केले आहे.
बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "हवामानामुळे निर्माण होऊ शकणारे अडथळे आणि स्टेडियममधील नियोजित नूतनीकरणाचे काम लक्षात घेता दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन'च्या विनंतीवरून सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. हा सामना आता १३ डिसेंबर २०२६ रोजी विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल."
🚨 News 🚨 First ODI between India and Sri Lanka to be held on December 13 shifted from Delhi to Visakhapatnam More details 🔽 | #TeamIndia | #INDvSL | @mflone_ https://t.co/P9wJkuYdtJ
— BCCI (@BCCI) November 5, 2026
श्रीलंकेचा संघ दौऱ्याची सुरुवात १३ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याने करेल. त्यानंतर दुसरा सामना १६ डिसेंबर रोजी बेंगळुरूमध्ये, तर तिसरा एकदिवसीय सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. एकदिवसीय सामना दुपारी २ वाजता सुरू होईल.
तर टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका २२ डिसेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना राजकोटमध्ये खेळवला जाईल. दुसरा टी-२० सामना २४ डिसेंबर रोजी कटक येथे होईल. तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना २७ डिसेंबर २०२६ रोजी पुण्यात आयोजित केला जाईल. सर्व टी-२० सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








