
नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानसमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे. गुरुवारी भारताने 'प्रलय' या 'क्वासी-बॅलिस्टिक' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या किनारपट्टीवरील 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटा'वरून ही चाचणी घेण्यात आली.
'प्रलय'ची निर्मिती 'डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन'द्वारे करण्यात आली आहे. स्वदेशी बनावटीच्या या 'क्वासी-बॅलिस्टिक' क्षेपणास्त्रात अत्याधुनिक प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ते अत्यंत अचूकतेने लक्ष्यावर मारा करू शकते. हे क्षेपणास्त्र विविध प्रकारचे पेलोड वाहून नेण्यास आणि वेगवेगळ्या टार्गेटवर मारा करण्यास सक्षम आहे. चाचणीनंतर संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "या यशस्वी चाचणीमुळे, सशस्त्र दलांमध्ये याचा समावेश होणे आता जवळपास निश्चित झाले आहे."
क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
हे कमी पल्ल्याचे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 'क्वासी-बॅलिस्टिक' क्षेपणास्त्र आहे. याची मारक क्षमता ३५० ते ५०० किलोमीटर अंतरावरील शत्रूची ठिकाणे पूर्णपणे नष्ट करण्यास सक्षम आहे. याची पेलोड क्षमता ही ३५० किलो ते १,००० किलो वजनाचे पारंपरिक वॉरहेड्स वाहून नेण्याची क्षमता आहे. हे सॉलिड फ्यूल रॉकेट मोटरद्वारे चालते. यामुळे ते लगेच तैनात करून लॉन्च करता येते.
'प्रलय'ची रचना विशेषत 'लाइन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल' आणि 'लाइन ऑफ कंट्रोल'वरील संभाव्य संघर्षांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. भारत सध्या ज्या 'इंटिग्रेटेड रॉकेट फोर्स'ची उभारणी करत आहे. त्यात हे क्षेपणास्त्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल.
इस्रोचे अधिकारी व्ही. नारायणन यांनी गुरुवारी सांगितले की, तमिळनाडूमध्ये पुढील वर्षापासून रॉकेट प्रक्षेपण सुरू होईल. तमिळनाडू सरकारने सुमारे २,३०० एकर जमीन संपादित करून ती आमच्याकडे सोपवली आहे.
Defence Minister Rajnath Singh tweets, "DRDO successfully conducted the flight test of the indigenously developed Pralay Missile off the coast of Odisha today at 1110 hrs. The test was conducted as part of user evaluation trials and successfully met all the stipulated objectives, as validated by data captured through various range instruments" (Video Source: Rajnath Singh/X)
— ANI (@ANI) November 5, 2026
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








