
कुडाळ : राष्ट्रीय एकता दिन आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून आज कुडाळ मध्ये एकता दौड अर्थात रन फॉर युनिटी या पाच किमी दौडचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला कुडाळवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
'चला, एकतेचा संदेश देऊया… एक भारत, श्रेष्ठ भारत !' आणि 'एकतेसाठी धावूया… एकतेसाठी चालूया' अशा टॅगलाईन घेऊन राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने कुडाळ पोलीस ठाणे आणि सिंधुदुर्ग पोलीस दल यांच्या वतीने आयोजित या एकता दौडसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच कुडाळ पोलीस ठाण्याच्या मैदानावर कुडाळवासीयांनी गर्दी केली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रत्येकाची नाव नोंदणी झाल्यांनतर वॉर्मअप घेण्यात आला. पोलीस बँडने राष्ट्रगीताची धून वाजविल्यानंतर प्रत्यक्ष दौड साठी सर्वजण सज्ज झाले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नायोमी साटम, डीवायएसपी राजेश भागवत यांनी या पाच किलोमीटरच्या वॉकेथॉन/मॅरेथॉन ला झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी भारत माता कि जय च्या घोषणा देण्यात आल्या.
कुडाळ पोलीस स्टेशन - पोस्ट ऑफिस चौक - एसटी स्टँड - काळप नाका - राज नाका - S N देसाई चौक - आणि पुन्हा कुडाळ पोलीस स्टेशन असा या एकता दौडचा मार्ग होता. मार्गावर वाटेत रिफ्रेश पॉईंटवर पाण्याची सोय करण्यात आली होती. या दौडमध्ये कुडाळ आणि सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, महिला मंडळ, लायन्स क्लब, कुडाळ मॅरेथॉन टीम, सायकल क्लब टीम, क्रिकेट क्लब आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कुडाळ पोलीस ठाण्यात या एकता दौडची सांगता झाल्यांनतर पहिल्या तीन क्रमांकाना डॉ. मोहन दहिकर आणि नायोमी साटम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. तसेच उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन दौड मध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार मानण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली. राष्ट्रगीत आणि राज्य गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस निरीक्षक विकास बडवे, कुडाळ मॅरेथॉनचे डॉ. जी. टी. राणे, सायकल क्लबचे गजानन कांदळगावकर, सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकरी श्री. कोरगावकर, लायन्स क्लबच्या अध्यक्षा स्नेहा नाईक, सचिव शोभा माने, पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








