LIVE UPDATES

MNGL Gas Fraud in Sawantwadi : सावंतवाडीत एमएनजीएलच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करा

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र : भाजप नगरसेवकांची पोलीस निरीक्षकांकडे धाव
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 02:20 PM
views 29  views
BJP councillors meet Sawantwadi police officials over fake MNGL gas connection calls and online OTP fraud targeting residents.

सावंतवाडी : शहरामध्ये एमएनजीएल या कंपनीचे सांगून नाव ऑनलाईन फसवणूक होत आहे. तसेच फ्रॉड कॉल करत सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना गंडा जात आहे. यापार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर व शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. या गुन्हाची गांभीर्याने दखल घेत सायबर कॉईमकडून सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. तर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी पोलीस अधीक्षकांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. 

सावंतवाडी शहरामध्ये या एक दोन दिवसात MNGL कंपनीचे नाव सांगून मोबाईलद्वारे संपर्क करीत नागरीकांना बिलाची किंवा कनेक्शेन जोडणी करीता ओटीपी मागून त्याच्या खात्यातील पैसे चोरून फार मोठी फसवणूक होत आहे.

सर्व सामान्य तथा जेष्ठ नागरीक यांना ऑनलाईन व्यवहाराबाबत जागृती नसल्याने अशा पध्दतीचे गुन्हाची गांभीर्याने दखल घेण्यात यावी व सायबर कॉईम मार्फत सखोल तपास करून संबधित गुन्हगारांना पकडुन शिक्षा होण्याकरिता त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी केली आहे‌. तसेच सावंतवाडी शहरामध्ये आयुर्वेदिक तथा ऑलोफेथिक औषधाबाबत अधिकीरी असल्याचे भासवून जनतेची दिशाभूल करीत असल्याबाबतही त्यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

सावंतवाडी शहरामध्ये परिसरात काही इसम हे आयुर्वेर्दिक तथा ऑलोफेथिक औषधांबाबत अधिकारी असल्याचे भासवुन लोकांच्या घरी जात त्यांना नागरिकांना आजार असल्याचे सांगून वेगवेगळे औषधांचे संशयास्पद पध्दतीने वेगवेगळ्या संस्थाशी संबंध असल्याचे सांगून दिशाभुल करित आहे.

अशा पद्धतीत घरोघरी फिरत रेखी करून भविष्यात संघठीत गुन्हगारी घडणे नाकारता येणार नाही. त्यामुळे आवश्यक तो तपास करून अशा इसमांना शोधून काढणे व चौकशी होणे आवश्यक आहे असं भाजप नगरसेवकांनी म्हटलं आहे. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नीलम नाईक, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी पोलीस अधीक्षकांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी शहरातील नागरिकांना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या नावाने बनावट कॉल आणि मेसेज करून फसवणूक केली जात असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत.

सायबर भामटे नागरिकांना गॅस बिल भरण्यासाठी, अपडेट करण्यासाठी किंवा बिल न भरल्यास गॅस कनेक्शन तोडण्याची धमकी देऊन ओटीपी, कस्टमर आयडी व खाजगी माहिती मागत आहेत. या सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने काल रात्री तक्रार अधिकृतपणे नोंदवण्यात आल्या आहेत.

बऱ्याच ग्राहकांची फसवणूक झाली असून शहरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषयात पोलीस प्रशासनाकडून तातडीने सायबर सेलतर्फे सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सौ. भोसले यांनी केली आहे.


ताजी बातमी

View all

Maharashtra Government Approves 49 Educational Items Kit for Construction Workers' Children
Maharashtra Education Scheme : बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य संच मिळणार
October 31, 2026
वेंगुर्ल्यात १ नोव्हेंबर रोजी महारक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन
October 31, 2026
कुडाळमध्ये राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ५ किमी ‘रन फॉर युनिटी’
October 31, 2026
Kaka Kudalkar criticizes former MLA Vaibhav Naik while defending MLA Nilesh Rane over political remarks in Sindhudurg.
वैभव नाईक यांनी जनतेचा विश्वास गमावला म्हणूनच ते माजी आमदार झाले
October 31, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Government Approves 49 Educational Items Kit for Construction Workers' Children
Maharashtra Education Scheme : बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य संच मिळणार
October 31, 2026
Kaka Kudalkar criticizes former MLA Vaibhav Naik while defending MLA Nilesh Rane over political remarks in Sindhudurg.
वैभव नाईक यांनी जनतेचा विश्वास गमावला म्हणूनच ते माजी आमदार झाले
October 31, 2026
घुंगुरकाठीतर्फे सिंधुदुर्गवासियांचा कसालमध्ये साहित्य सोहळा
October 31, 2026
Kunkeshwar Deepotsav 2026 at Kunkeshwar Temple in Devgad, featuring thousands of traditional lamps along the seashore.
Kunkeshwar Deepotsav 2026 : दीपावली पाडव्याला हजारो दिव्यांनी उजळणार कुणकेश्वर मंदिर सागरकिनारा
October 31, 2026