
वेंगुर्ला : आदित्य सुभाष हळदणकर मित्रमंडळ आणि नाईक जिम, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १ नोव्हेंबर २०२६ रोजी वेंगुर्ला येथे महा रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सिद्धिविनायक हॉल, भटवाडी, पेट्रोल पंपाजवळ, वेंगुर्ला याठिकाणी हे रक्तदान शिबिर रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आरोग्य शिबिर पार पडणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
आरोग्य शिबिरात विविध वैद्यकीय सेवा
आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. डॉ. गडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांधेदुखी व वातविकारासंदर्भात तपासणी आणि सल्ला देण्यात येणार आहे. तसेच डॉ. नलिनी गोडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली दंत तपासणी व दंतविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय आयुष्मान भारत कार्ड तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि PM-JAY योजनेसंदर्भात माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निलेश राणे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजू परब (जिल्हाप्रमुख, सिंधुदुर्ग, नगरसेवक सावंतवाडी) उपस्थित राहणार आहेत. रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व मोठे आहे. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शनामुळे नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक राहण्यास मदत होते. वेंगुर्ला शहर आणि परिसरातील नागरिकांनी या महा रक्तदान व आरोग्य शिबिरात सहभागी होऊन उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








