
छत्तीसगड : तुम्ही अनेक रामभक्तांना पाहिलं असेल... पण कधी असा समाज पाहिलाय, ज्यांनी मंदिराची पायरी कधीच तुडवली नाही, मूर्तीपूजा केली नाही... पण त्यांच्या संपूर्ण शरीरावर फक्त आणि फक्त 'राम' नाम कोरलेला आहे? छत्तीसगडच्या ‘रामनामी समुदायाची’ ही गोष्ट अंगावर काटा आणणारी आहे. या समाजातल्या लोकांना मंदिराची गरज नाही, कारण ते स्वतःच्या शरीरालाच मंदिर मानतात. एकमेकांना भेटताना ते 'राम-राम' म्हणतात.
विशेष म्हणजे, ज्यांच्या माथ्यावर नाव असतं त्यांना 'सर्वांगी' आणि संपूर्ण अंगावर नाव असतं त्यांना 'नखशिख' म्हटलं जातं!" पण शरीरावर रामाचं नाव गोंदवून मंदिराजवळ न जाण्यामागे एका मोठ्या बंडाची कहाणी आहे! असं म्हणतात की, एके काळी उच्चवर्णीयांनी यांना मंदिरात जाण्यापासून रोखलं होतं. याचा निषेध म्हणून, 1890 साली 'परशुराम' नावाच्या एका तरुणाने शरीरावर रामनाम गोंदवून या अन्यायाविरुद्ध बंड पुकारलं! हा लढा इतका वाढला की 1912 मध्ये हा मुद्दा ब्रिटीश कोर्टापर्यंत पोहोचला होता. मंदिरात प्रवेश नाकारल्या गेलेल्या माणसांनी स्वतःच्या शरीरालाच देवाचं घर बनवलं. भक्तीची ही अनोखी आणि विद्रोही परंपरा आजही छत्तीसगडमध्ये कायम आहे.
संकलन - स्वप्निल परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद
ताजी बातमी
View all

Kokansad Diwali Ank 2026 : साहित्यिक फराळाबरोबरच जिवंत सांस्कृतिक दस्ताऐवज
November 14, 2026

दाभोळे पोखरबाव येथील ३० वर्षीय तरुणाचे अपहरण
November 14, 2026

वरेरी येथे ३८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू
November 14, 2026

दाभोळे तिठा येथे घराच्या अंगणातून दुचाकी चोरीला
November 14, 2026
संबंधित बातम्या
View all

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देणार १.८० लाख रुपयांपर्यंतच्या किमतीचे लॅपटॉप अन् टॅब, जाणून घ्या नियम
November 14, 2026

ह्युंदाई Bayon च्या HX5 व्हेरिएंटमध्ये सनरूफ, वायरलेस चार्जिंगसह भन्नाट फीचर्स; जाणून घ्या किंमत
November 14, 2026

सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबाचा लतीफ भट, सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहीम
November 14, 2026

मायक्रोसॉफ्टचे सर्वर डाउन! आऊटलूक, टीम्स आणि कोपायलटची सेवा ठप्प; जगभरातील लाखो युजर्सना फटका
November 13, 2026




