LIVE UPDATES

Kokansad Diwali Ank 2026 : साहित्यिक फराळाबरोबरच जिवंत सांस्कृतिक दस्ताऐवज

मुंबईचे साहित्यिक गुरुदास पणदूरकर यांच्याकडून ‘कोकणसाद’ दिवाळी अंकाचा गौरव!
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 14, 2026 09:02 PM
views 37  views
Kokansad Diwali magazine 2026 praised by renowned Marathi literary figure Gurudas Pandurkar for its cultural and literary value.

​मुंबई : दिवाळीच्या फराळात जशी खमंग चवींची मेजवानी असते, तसाच शब्दांचा आणि विचारांचा अस्सल गोडवा यंदाच्या 'कोकणसाद' दिवाळी अंकाने वाचकांसाठी आणला आहे. मुंबईचे प्रख्यात साहित्यिक गुरुदास पणदूरकर यांनी यंदाच्या कोकणसाद दिवाळी अंकाविषयी अत्यंत गौरवोद्गार काढले असून, "यंदाचा कोकणसाद दिवाळी अंक म्हणजे केवळ वाचनाचा आनंद नसून, तो एक अमूल्य सांस्कृतिक दस्ताऐवज आहे," अशी सखोल प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

​आपल्या प्रतिक्रिया देताना पणदूरकर यांनी अंकातील आशयघनतेचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, ​"दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक सुंदर सांस्कृतिक परंपरा आहे. परंतु, यंदाच्या 'कोकणसाद'ने या परंपरेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. हा अंक चाळताना जणू काही कोकणच्या मातीचा सुवास आणि तिथली समृद्ध संस्कृती पानापानांवरून आपली साक्ष पटवून देते. हा केवळ एक साहित्यिक फराळ नसून, भावी पिढीसाठी जपून ठेवावा असा एक प्रगल्भ सांस्कृतिक दस्ताऐवज आहे."