LIVE UPDATES

दाभोळे पोखरबाव येथील ३० वर्षीय तरुणाचे अपहरण

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 14, 2026 08:51 PM
views 566  views

देवगड : देवगड तालुक्यातील दाभोळे पोखरबाव येथील अक्षय संजय धुरी (३०) याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार त्याचे वडील संजय वासुदेव धुरी (५६) यांनी देवगड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अक्षय धुरी याला त्याच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण करून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वडील संजय धुरी यांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास देवगडचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार पवार करीत आहेत.