LIVE UPDATES

ह्युंदाई Bayon च्या HX5 व्हेरिएंटमध्ये सनरूफ, वायरलेस चार्जिंगसह भन्नाट फीचर्स; जाणून घ्या किंमत

Hyundai Bayon HX5 Price in India : बायॉन HX5 च्या मॅन्युअल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १२.४४ लाख रुपये आहे, तर आयव्हीटी ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत १३.८४ लाख रुपये आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 14, 2026 03:48 PM
views 185  views
Hyundai Bayon HX5 SUV featuring a stylish exterior design and modern features.

मुंबई : ह्युंदाईची नवीन 'बेयोन' (Bayon) भारतीय बाजारात दाखल झाली असून ऑक्टोबर महिन्यात तिची ३,४४९ युनिट्सची विक्री झाली आहे. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ९.९९ लाख रुपयांपासून १७.९९ लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये HX2, HX3, HX3+, HX5, HX6, HX8 आणि HX10 असे विविध ट्रिम पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी 'HX5'हा मिड रेंजमधील प्रकार असून तो किमतीच्या तुलनेत व्हॅल्यू फॉर मनी पर्याय ठरतो. विशेष म्हणजे, आयव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय याच HX5 व्हेरिएंटपासून सुरू होतो.

बायॉन HX5 च्या मॅन्युअल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १२.४४ लाख रुपये आहे, तर आयव्हीटी ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत १३.८४ लाख रुपये आहे. Bayon मध्ये केवळ १.५ लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचा पर्याय उपलब्ध आहे. हे इंजिन ११५ पीएस पॉवर आणि १४३.८ एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ६-स्पीड मॅन्युअल आणि आयव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा समावेश आहे.

HX5 व्हेरिएंटमध्ये सिंगल-प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, आकर्षक एलईडी डीआरएल आणि पोझिशनिंग लॅम्प्स, एलईडी टेल लॅम्प्स आणि मागील बाजूस एलईडी टर्न इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. मात्र, यात ड्युअल-प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, समोरील एलईडी टर्न इंडिकेटर्स आणि 'पडल लॅम्प्स' दिलेले नाहीत. बेयोन HX5 मध्ये आर 17 आकाराचे स्टील व्हील्स आहेत. यावर २१५/५५ आकाराचे टायर बसवलेले आहेत.

इंटिरिअरबद्दल सांगायचे तर, बेयोन HX5 मध्ये काळ्या आणि ऑलिव्ह ग्रे रंगांचे 'ड्युअल-टोन' थीम देण्यात आले आहे. इतर प्रमुख फिचर्समध्ये ड्युअल-कर्व्ह पॅनोरामिक डिस्प्ले, ४-डॉट स्टिअरिंग व्हील, ओटीए अपडेट्स, वायरलेस ॲपल कारप्ले  आणि अँड्रॉइड ऑटो, व्हॉइस रिकग्निशन, ६-स्पीकर ऑडिओ सिस्टम, ब्लूटूथ, वायरलेस चार्जर, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्टिअरिंगवर बसवलेले कंट्रोल्स यांचा समावेश आहे. 

तसेच HX5 मध्ये सिंगल-पेन इलेक्ट्रिक सनरूफ, पॅडल शिफ्टर्स, पॉवर विंडोज, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल आणि ह्युंदाई 'ब्लूलिंक' कनेक्टेड कार टेक्नलॉजी मिळते. HX5 मध्ये ड्रायव्हरची सीट उंचीनुसार मॅन्युअली ॲडजस्ट करता येते. बेयोनच्या सर्व प्रकारांमध्ये ३५ हून अधिक सेफ्टी फिचर्स दिले जातात. HX5 प्रकारामध्ये ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि रिअर-व्ह्यू कॅमेरा यांचा समावेश आहे.


ताजी बातमी

View all

Kokansad Diwali magazine 2026 praised by renowned Marathi literary figure Gurudas Pandurkar for its cultural and literary value.
Kokansad Diwali Ank 2026 : साहित्यिक फराळाबरोबरच जिवंत सांस्कृतिक दस्ताऐवज
November 14, 2026
दाभोळे पोखरबाव येथील ३० वर्षीय तरुणाचे अपहरण
November 14, 2026
वरेरी येथे ३८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू
November 14, 2026
दाभोळे तिठा येथे घराच्या अंगणातून दुचाकी चोरीला
November 14, 2026
संबंधित बातम्या

View all

Ramnami Community of Chhattisgarh : ज्यांच्या अंगावरचे प्रत्येक अक्षर रचतेय एक इतिहास...
November 14, 2026
New Finance Ministry policy allowing eligible central government employees to retain official laptops and tablets after four years.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देणार १.८० लाख रुपयांपर्यंतच्या किमतीचे लॅपटॉप अन् टॅब, जाणून घ्या नियम
November 14, 2026
CRPF security personnel during a security operation following the terrorist attack in Kulgam, Jammu and Kashmir.
सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबाचा लतीफ भट, सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहीम
November 14, 2026
Microsoft 365 outage affecting Outlook, Microsoft Teams and Copilot services.
मायक्रोसॉफ्टचे सर्वर डाउन! आऊटलूक, टीम्स आणि कोपायलटची सेवा ठप्प; जगभरातील लाखो युजर्सना फटका
November 13, 2026