LIVE UPDATES

मायक्रोसॉफ्टचे सर्वर डाउन! आऊटलूक, टीम्स आणि कोपायलटची सेवा ठप्प; जगभरातील लाखो युजर्सना फटका

Microsoft 365 Outage : दैनंदिन कामकाजासाठी मायक्रोसॉफ्ट ३६५ सेवांवर अवलंबून आहेत अशा कंपन्यां आणि कर्मचारी प्रभावित झाले आहेत.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 13, 2026 05:29 PM
views 110  views
Microsoft 365 outage affecting Outlook, Microsoft Teams and Copilot services.

नवी दिल्ली : एका मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवांवर परिणाम झाला आहे. याचा फटका मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आधारित सर्व्हिस 'मायक्रोसॉफ्ट ३६५'ला बसला असून यात आउटलुक (Outlook), मायक्रोसॉफ्ट टीम्स (Microsoft Teams) आणि एआय (AI) असिस्टंट 'को-पायलट' (Copilot) यांसारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. या बिघाडामुळे जगभरातील युजर्सना ईमेल ओपन करण्यात, मेसेज पाठवण्यात आणि महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात अडचणी आल्या. हा बिघाड १२ नोव्हेंबर रोजी झाला असून अनेक तास उलटूनही कंपनीला सेवा पूर्ववत करण्यात यश आलेले नाही.

दैनंदिन कामकाजासाठी मायक्रोसॉफ्ट ३६५ सेवांवर अवलंबून आहेत अशा कंपन्यां आणि कर्मचारी प्रभावित झाले आहेत. युजर्सनी तक्रार केली की त्यांना आउटलुकमध्ये ईमेल उघडता येत नव्हते किंवा नवीन मेसेज पाठवता आणि घेताही येत नव्हते. तसेच मायक्रोसॉफ्ट टीम्समधील काही फिचर्स आणि 'को-पायलट'च्या कामावरही परिणाम झाला.

'डाउनडिटेक्टर' या वेबसाइटनुसार, या घटनेदरम्यान आउटलुकबाबतच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून तक्रारींची संख्या १,३०,००० च्या वर पोहोचली होती. हजारो युजर्सनी इतर मायक्रोसॉफ्ट ३६५ सेवांबाबतही तक्रारी नोंदवल्या.

मायक्रोसॉफ्टने या परिस्थितीबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, हा प्रॉब्लेम सायबर हल्ला किंवा हॅकिंगमुळे झाल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तपासात असे दिसून आले की, सर्व्हर आणि नेटवर्कशी संबंधित एक टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण झाला होता. विशेषतः काही सर्व्हरवर सिक्युअर कनेक्शन बनवणारी सिस्टीम ओव्हरलोड झाली होती. यामुळे सर्व्हर रिक्वेस्टना प्रतिसाद देऊ शकले नाहीत. परिणामी विविध सेवा विस्कळीत झाल्या. कंपनी सध्या हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पावले उचलत आहे. यामध्ये सर्व्हरची क्षमता वाढवणे, नेटवर्क सेटिंग्जमध्ये बदल करणे आणि प्रभावित सिस्टिम रिस्टार्ट करणे यांचा समावेश आहे.


ताजी बातमी

View all

उपजिल्हा रुग्णालय परिसरातील पायऱ्यांचे रूप पालटले
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg Political News : कणकवलीत रंगला १९८३ च्या शिवसैनिकांचा स्नेह मेळावा
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
बोअरवेलमधील पंप चोरीला
November 13, 2026
Maharashtra Minister Uday Samant speaks about Deputy Chief Minister Eknath Shinde's leadership.
Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास : डॉ. उदय सामंत
November 13, 2026
संबंधित बातम्या

View all

TVS NTORQ 150 scooter in the newly introduced Spectral Green colour
TVS NTORQ 150 च्या चाहत्यांसाठी खुशखबर! नवीन 'स्पेक्ट्रल ग्रीन' कलर लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
November 13, 2026
Crystal Crop Protection IPO details including issue size, price band and opening date.
Upcoming IPO : शेअर बाजारात येतोय कृषी क्षेत्रातील मोठा IPO! 'या' तारखेपासून गुंतवणुकीची संधी; जाणून घ्या सविस्तर
November 13, 2026
Amul and Mother Dairy milk price hike in India from November 12 2026
सामान्यांच्या खिशाला बसणार महागाईचा फटका! दूधाच्या दरात २ ते ६ रुपयांची वाढ; पाहा नवीन दर
November 12, 2026
President of India Droupadi Murmu
स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई देशात अव्वल तर स्वच्छ किनारपट्टी शहरांच्या यादीत रत्नागिरीचा तिसरा क्रमांक
November 11, 2026