LIVE UPDATES

दाभोळे तिठा येथे घराच्या अंगणातून दुचाकी चोरीला

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 14, 2026 08:46 PM
views 190  views

देवगड : देवगड तालुक्यातील दाभोळे तिठा येथे घराच्या अंगणात उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुकाराम फकीर कोयंडे यांनी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कोयंडे यांनी त्यांच्या घराच्या अंगणात काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्लेंडर दुचाकी (एमएच ०७, एआर ९८३४) उभी करून ठेवली होती. ८ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजल्यापासून ते ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली.

या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर देवगड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार विनीता भुजे करीत आहेत.