LIVE UPDATES

वरेरी येथे ३८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू

ग्रामीण रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 14, 2026 08:48 PM
views 118  views

देवगड : मूळ सोलापूर येथील व सध्या देवगड तालुक्यातील वरेरी-कुळयेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या रामदास पुराणिक लोहार (३८) यांचे शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास देवगड ग्रामीण रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास लोहार यांना दारूचे व्यसन होते. शनिवारी अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी त्यांचे बंधू अंबादास पुराणिक लोहार (४२) यांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार पवार करीत आहेत.