LIVE UPDATES

US Midterm Election Results 2026 : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का, डेमोक्रॅट्सला मिळाले बहुमत

अमिरिकेचे पहिले मुस्लिम सिनेटर बनणार अब्दुल अल-सईद, भारतीय वंशाच्या उमेदवारांचीही बाजी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 04, 2026 05:39 PM
views 93  views
US Midterm Election Results 2026 showing Democratic Party victories in the Senate and House, with Donald Trump and Indian-American candidates in the spotlight.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर आता निकालांची वेळ आली आहे. या निवडणुकांमध्ये 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज'च्या सर्व ४३५ जागा, सिनेटच्या ३५ जागा आणि ३६ राज्यांमधील गव्हर्नरपदांसाठी मतदान झाले. या मध्यावधी निवडणुकांचे निकाल २०२८ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठीची राजकीय दिशाही ठरवू शकतात.

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेटमध्ये बहुमत मिळवले आहे. त्याचबरोबर, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये त्यांनी २१८ जागा जिंकून बहुमताचा आकडा ओलांडला आहे.

मिशिगनमध्ये डेमोक्रॅटिक उमेदवार अब्दुल अल सईद विजयी झाले आहेत. या विजयामुळे अमेरिकेच्या इतिहासात सिनेट सदस्य म्हणून निवडून येणारे ते पहिले मुस्लिम व्यक्ती ठरले आहेत. ट्रम्प यांनी जाहीरपणे अब्दुल यांना "जिहादी" असे संबोधले होते. २५ ऑक्टोबर रोजी मिशिगनमधील एका निवडणूक रॅलीत ट्रम्प म्हणाले होते, "मी येथे एका "जिहादी"ला आणि "मुस्लिम ब्रदरहुड'च्या सदस्याला अमेरिकन सिनेट सदस्य बनण्यापासून रोखण्यासाठी आलो आहे."

ट्रम्प यांनी अब्दुल यांच्यावर दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोपही केला. ९/११ दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत ट्रम्प यांनी अल-सईद यांची तुलना थेट विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांशी केली होती. 

भारतीय वंशाच्या उमेदवारांची निवडणूकीत बाजी

दरम्यान, भारतीय वंशाच्या अनेक उमेदवारांनीही ही निवडणूक लढवली. त्यापैकी अनेकांनी दणदणीत विजय मिळवला, तर काहींना निराशा पत्करावी लागली. सुरुवातीच्या निकालांमध्ये भारतीय-अमेरिकन वंशाच्या अनेक उमेदवारांनी डेमोक्रॅटिक पक्षाला आघाडी मिळवून देण्यात मदत केली. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार सुहास सुब्रमण्यम आणि अरुणा मिलर आपापल्या जागा टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले, तर पिया दांडिया यांनी विजय मिळवून इतिहास घडवला.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज

हाऊसमध्ये एकूण ४३५ जागा आहेत आणि त्या सर्वांसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने २२८ जागा जिंकल्या आहेत, तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने १४४ जागा जिंकल्या आहेत.

गव्हर्नर

३६ पैकी ३१ जागांचे निकाल हाती आले आहेत. डेमोक्रॅट्सनी २० जागा जिंकल्या आहेत, तर रिपब्लिकन्सनी ११ जागा जिंकल्या आहेत. ५ राज्यांमध्ये मतमोजणी अजूनही सुरू आहे.

सिनेट

सिनेटच्या १०० जागांपैकी ३५ जागांसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, यापैकी ३२ जागांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने २० जागा जिंकल्या आहेत, तर रिपब्लिकन पक्षाने १३ जागा जिंकल्या आहेत. 

उर्वरित ३ जागांसाठी मतमोजणी अजूनही सुरू आहे. या निकालांसह, डेमोक्रॅटिक पक्षाकडे ५४ जागा आहेत, तर रिपब्लिकन पक्षाकडे ४३ जागा आहेत.


ताजी बातमी

View all

Traditional Konkani poha being prepared at a rice mill in Sindhudurg ahead of Diwali amid reduced paddy production.
Sindhudurg Poha : सिंधुदुर्गात भात उत्पादन घटल्याने गावठी पोहे महागणार
November 04, 2026
Mumbai Suburban men's and women's teams celebrate their victories at the Mumbai University Inter-Zonal Kabaddi Championship in Ratnagiri.
मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत मुंबई सबर्बनची महिला, पुरुषांच्या गटात बाजी
November 04, 2026
सावंतवाडीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा शैक्षणिक उपक्रम
November 04, 2026
Ratnagiri athletes Dr Nitin Sangaonkar and Rahul Bhosale successfully complete the Goa Ironman 70.3 Triathlon in 7 hours and 2 minutes.
Goa Ironman 70.3 : गोवा आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉनमध्ये रत्नागिरीच्या दोन शिलेदारांची बाजी
November 04, 2026
संबंधित बातम्या

View all

Razorpay IPO SEBI approval and fintech company stock market listing plans
शेअर बाजारात उतरणार रेझरपे! आयपीओसाठी सेबीची मंजुरी, एआय आधारित पेमेंट सेवांवरही विशेष लक्ष
November 04, 2026
 Indian-flagged cargo ship MSV Al-Yusufi attacked near Oman coast, leaving one Indian sailor dead.
Indian Ship Attacked : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय मालवाहू जहाजावर हल्ला, भारतीय खलाशाचा मृत्यू तर १३ जणांची सुटका
November 03, 2026
Coal India subsidiary SECL files DRHP with SEBI for its proposed IPO of 66.81 crore shares.
SECL IPO 2026 : कोल इंडियाची मोठी घोषणा! एसईसीएलचा आयपीओ येणार बाजारात, ४ नोव्हेंबरला शेअर्सवर डिव्हिडंडची संधी
November 02, 2026
Mangaluru man converts his two-wheeler into a mobile tyre puncture repair shop to help stranded motorists.
Mobile Puncture Repair Shop : चालत्या - बोलत्या पंक्चर दुकानाची कमाल
November 02, 2026