LIVE UPDATES

नोकरीसोबत एआय, सायबर सुरक्षेचे शिक्षण घेण्याची संधी! ६ महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स, जाणून घ्या सविस्तर

IIT Delhi AI Cyber Security Course : सीईपी-आयआयटी दिल्लीद्वारे डिजिटल पद्धतीने सत्यापित केलेले 'ई-प्रमाणपत्र' विद्यार्थ्यांना दिले जाईल. या अभ्यासक्रमाचे वर्ग दर शनिवारी ऑनलाइन पद्धतीने घेतले जातील.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 06, 2026 01:59 PM
views 92  views
IIT Delhi launches six-month AI and Cyber Security certificate course for working professionals.

दिल्ली : सध्या एआयचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. एआयचा वापर वाढत असल्याने कंपन्या आणि संस्थांसमोर निर्माण झालेली सुरक्षेची आव्हाने लक्षात घेऊन एआय या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अनेक सर्टिफिकेट प्रोग्रॅम उपलब्ध आहेत. जर तुम्ही नोकरी करत असताना सायबर सुरक्षा आणि एआय विषयांचा अभ्यास करण्यास इच्छुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीने विशेषतः नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी सायबर सुरक्षा आणि एआय सुरक्षेवर आधारित सहा महिन्यांचा प्रमाणपत्र कार्यक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम संस्थेच्या 'कंटिन्यूइंग एज्युकेशन प्रोग्राम' अंतर्गत राबवला जात आहे. 

जे विद्यार्थी हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करतील त्यांना सीईपी-आयआयटी दिल्लीद्वारे डिजिटल पद्धतीने सत्यापित केलेले 'ई-प्रमाणपत्र' दिले जाईल. या अभ्यासक्रमाचे वर्ग दर शनिवारी ऑनलाइन पद्धतीने घेतले जातील. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याकडे अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान, गणित, सांख्यिकी किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी (बॅचलर किंवा मास्टर डिग्री) असणे आवश्यक आहे. यामध्ये किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांना किमान एका प्रोग्रामिंग भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

'कंटिन्यूइंग एज्युकेशन प्रोग्राम' या अभ्यासक्रमात एआय सिस्टिमवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांची माहिती देणे आणि त्यापासून बचाव करण्यास शिकविले जाणार आहे. अभ्यासक्रमात 'ॲडव्हर्सरियल मशिन लर्निंग', 'लार्ज लँग्वेज मॉडेल्स'मधील 'प्रॉम्प्ट इंजेक्शन', 'एजंटिक एआय'चा गैरवापर आणि 'मॉडेल सप्लाय चेन'वरील हल्ले यांसारख्या विषयांचा समावेश आहे. विशेषतः 'एजंटिक एआय' शी संबंधित पाच प्रकारच्या सायबर हल्ल्यांवर यात भर देण्यात आला आहे. मल्टिमॉडेल जेलब्रेक्स, 'मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल' प्रॉम्प्ट इंजेक्शन, मेमरी पॉयझनिंग, 'टूल-कॉलिंग'चा गैरवापर आणि 'मॉडेल हब सप्लाय चेन'वरील हल्ले.

या अभ्यासक्रमात एकूण ७८ तासांचे थेट ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण पाच मॉड्यूल्समध्ये विभागलेले आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना एक 'कॅपस्टोन प्रोजेक्ट' पूर्ण करणे आवश्यक आहे. व्यावहारिक प्रशिक्षणादरम्यान, सहभागींना पीवायआरटीआय, जीएआरएके, सिगस्टोअर, ओपीए आणि फाल्को यांसारखी विविध टूल्स आणि फ्रेमवर्क्स वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सहा महिन्यांच्या या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची एकूण फी सुमारे १ लाख ४० हजार रुपये इतके आहे. यावर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल. जीएसटीसह एकूण शुल्क १ लाख ६५ हजार २०० रुपये होते. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शुल्क आणि हप्त्यांच्या पर्यायांबाबतची अपडेटेड माहिती अधिकृत माध्यमांतून तपासून घ्यावी, असा सल्ला दिला जातो.


ताजी बातमी

View all

मालवणमधील २०५ घरेलू कामगारांना दिवाळीची भेट
November 06, 2026
उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव जाधव यांना ‘आयडॉल शिक्षक सन्मान’
November 06, 2026
देवगडमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासूर स्पर्धा
November 06, 2026
स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार
November 06, 2026
संबंधित बातम्या

View all

India's indigenous Pralay quasi-ballistic missile developed by DRDO
Pralay Missile Test : भारताची सामरिक ताकद वाढणार! डीआरडीओच्या ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
November 06, 2026
Kadamba Transport Corporation employees in Goa announce a 24-hour strike from November 12 over 18 pending demands.
Kadamba Transport Employees Strike : गोव्याच्या कदंब परिवहन कर्मचाऱ्यांचा १२ नोव्हेंबरपासून संपाचा इशारा
November 05, 2026
US Midterm Election Results 2026 showing Democratic Party victories in the Senate and House, with Donald Trump and Indian-American candidates in the spotlight.
US Midterm Election Results 2026 : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का, डेमोक्रॅट्सला मिळाले बहुमत
November 04, 2026
Razorpay IPO SEBI approval and fintech company stock market listing plans
शेअर बाजारात उतरणार रेझरपे! आयपीओसाठी सेबीची मंजुरी, एआय आधारित पेमेंट सेवांवरही विशेष लक्ष
November 04, 2026