LIVE UPDATES

Kadamba Transport Employees Strike : गोव्याच्या कदंब परिवहन कर्मचाऱ्यांचा १२ नोव्हेंबरपासून संपाचा इशारा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 05:10 PM
views 72  views
Kadamba Transport Corporation employees in Goa announce a 24-hour strike from November 12 over 18 pending demands.

पणजी : कदंब परिवहन महामंडळातील (केटीसी) कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून, येत्या १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून २४ तासांचा संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. कदंब परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाला केटीसी ड्रायव्हर्स अँड अलाइड एम्प्लॉईज असोसिएशनने यासंदर्भात संपाची अधिकृत नोटीस बजावली आहे. संघटनेने एकूण १८ मागण्या मांडल्या असून, त्या मान्य न झाल्यास राज्यातील कदंब बससेवा पूर्णपणे ठप्प करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ३०० नवीन डिझेल बसगाड्यांची भरती करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. त्याचबरोबर बसचालक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृहे तसेच विश्रांतीगृहांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या या १८ मागण्यांकडे महामंडळ व्यवस्थापनाने गांभीर्याने लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी संघटनेची भूमिका आहे. मात्र, मागण्यांबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून २४ तासांचा संप करण्यात येईल, असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे. 

या संपामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे संपापूर्वी महामंडळ व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांच्यात चर्चा होऊन तोडगा निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा

संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये रोजंदारीवरील आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, नव्याने लागू करण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन (ईटीएम) प्रणाली मागे घेणे आणि सातव्या वेतन आयोगाची थकीत देणी तातडीने अदा करणे यांचा समावेश आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविणे आणि त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. 

विशेषतः इलेक्ट्रिक बस चालविणाऱ्या चालकांच्या वेतनाचा आणि कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधांचा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) लाभ पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.


ताजी बातमी

View all

Sawantwadi Mayor Shraddharaje Bhosale celebrates Diwali with municipal employees and sanitation workers by distributing Diwali faral.
Sawantwadi Diwali Celebration : सफाई मित्रांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी
November 05, 2026
मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदूरकरची विभाग स्तरावर विक्रमी पाचव्यांदा निवड
November 05, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News :अनधिकृत मासेविक्री करताना आढळल्यास कारवाई
November 05, 2026
Industries Minister Uday Samant announces reduced MIDC fire charges and ₹10 crore funding for electrical infrastructure development at Kudal MIDC.
Sindhudurg MIDC Development : सिंधुदुर्गातील उद्योगांना चालना; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

US Midterm Election Results 2026 showing Democratic Party victories in the Senate and House, with Donald Trump and Indian-American candidates in the spotlight.
US Midterm Election Results 2026 : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का, डेमोक्रॅट्सला मिळाले बहुमत
November 04, 2026
Razorpay IPO SEBI approval and fintech company stock market listing plans
शेअर बाजारात उतरणार रेझरपे! आयपीओसाठी सेबीची मंजुरी, एआय आधारित पेमेंट सेवांवरही विशेष लक्ष
November 04, 2026
 Indian-flagged cargo ship MSV Al-Yusufi attacked near Oman coast, leaving one Indian sailor dead.
Indian Ship Attacked : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय मालवाहू जहाजावर हल्ला, भारतीय खलाशाचा मृत्यू तर १३ जणांची सुटका
November 03, 2026
Coal India subsidiary SECL files DRHP with SEBI for its proposed IPO of 66.81 crore shares.
SECL IPO 2026 : कोल इंडियाची मोठी घोषणा! एसईसीएलचा आयपीओ येणार बाजारात, ४ नोव्हेंबरला शेअर्सवर डिव्हिडंडची संधी
November 02, 2026