LIVE UPDATES

शेअर बाजारात उतरणार रेझरपे! आयपीओसाठी सेबीची मंजुरी, एआय आधारित पेमेंट सेवांवरही विशेष लक्ष

Razorpay IPO SEBI Approval : रेझरपेचा आयपीओ भारतीय फिनटेक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. कंपनीच्या महसूलामध्ये वेगाने वाढत होत असून डिजिटल पेमेंट बाजारपेठेत कंपनीचे स्थान अत्यंत भक्कम आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 04, 2026 02:18 PM
views 54  views
Razorpay IPO SEBI approval and fintech company stock market listing plans

नवी दिल्ली : भारतातील प्रमुख फिनटेक कंपन्यांपैकी एक असलेली 'रेझरपे' आता शेअर बाजारात आपला आयपीओ घेऊन येणार आहे. कंपनीला त्यांच्या 'इनिशियल पब्लिक ऑफरिंग'साठी सेबीची मंजुरी मिळाली आहे. आयपीओ जाहीर झाल्यानंतर ऑफरची किंमत, शेअर्सची संख्या आणि इतर आर्थिक माहिती उघड केली जाईल. यामुळे गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याशी संबंधित जोखीम आणि संभाव्य संधी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील.

बेंगळुरूस्थित रेझरपे आपल्या आयपीओद्वारे सुमारे ५,५०० कोटी ते ६,५०० कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. सूत्रांनुसार, कंपनीचे व्हॅल्यूएशन सुमारे ५ अब्ज डॉलर्स गाठण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. रेझरपे कोणत्या किमतीवर बाजारात प्रवेश करेल आणि त्यांचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी कोणती संधी घेऊन येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रेझरपेचा आयपीओ भारतीय फिनटेक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. कंपनीच्या महसूलामध्ये वेगाने वाढत होत असून डिजिटल पेमेंट बाजारपेठेत कंपनीचे स्थान अत्यंत भक्कम आहे.  मे २०२५ मध्ये, रेझरपेने आपली 'रिव्हर्स-फ्लिप' प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये कंपनीच्या मूळ घटकाचे मुख्यालय अमेरिकेतून भारतात हलवण्यात आले. या प्रक्रियेचा भाग म्हणून अमेरिकेत नोंदणीकृत असलेली मूळ कंपनी भारतीय युनिट 'रेझरपे सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये विलीन करण्यात आली. भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याच्या योजनेचा भाग म्हणून कंपनीने मे २०२३ मध्ये ही प्रक्रिया सुरू केली होती. रेझरपे आता एआय-आधारित पेमेंट सेवांवर लक्ष केंद्रित करत आहे.

रेझरपे केवळ आपल्या सध्याच्या डिजिटल पेमेंट व्यवसायापुरतेच मर्यादित राहण्याचा विचार करत नाहीये. "आगामी काळात एआय लोकांच्या खरेदी करण्याच्या आणि पैसे भरण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणू शकते. ज्याप्रमाणे यूपीआयने भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात क्रांती घडवून आणली होती. त्यांच्या मते, एआय-आधारित पेमेंट सिस्टिम स्वीकारली जाण्यासाठी काही काळ लागू शकतो, परंतु पुढील पाच वर्षांत ऑनलाइन व्यापारासाठी हे एक प्रमुख माध्यम म्हणून समोर येऊ शकते." असे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षिल माथूर यांनी म्हटले. 

(डिस्क्लेमर : माहिती शेअर करण्याच्या उद्देशाने हा लेख देण्यात आला आहे. गुंतवणुकीचा सल्ला या लेखात देण्यात आलेला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम असते. त्यामुळे स्वतःच्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणुक करा. गुंतवणूक करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा...)


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
घोडेमुख पेंडूरात ८ नोव्हेंबरला डबलबारी भजनाचा सामना
November 04, 2026
Ayushmann Khurrana Radhika Apte and Tabu in Andhadhun crime thriller movie
ओटीटीवर पाहा आयुष्मान खुरानाचा जबरदस्त क्राईम थ्रिलर चित्रपट
November 04, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : सावंतवाडीत उद्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर
November 04, 2026
Kudli to Chiplun ST bus accident near Ambekarwadi Shir Bhatle in Guhagar
ST Bus Accident : धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने नियंत्रण सुटले अन् घडला अपघात
November 04, 2026
संबंधित बातम्या

View all

 Indian-flagged cargo ship MSV Al-Yusufi attacked near Oman coast, leaving one Indian sailor dead.
Indian Ship Attacked : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय मालवाहू जहाजावर हल्ला, भारतीय खलाशाचा मृत्यू तर १३ जणांची सुटका
November 03, 2026
Coal India subsidiary SECL files DRHP with SEBI for its proposed IPO of 66.81 crore shares.
SECL IPO 2026 : कोल इंडियाची मोठी घोषणा! एसईसीएलचा आयपीओ येणार बाजारात, ४ नोव्हेंबरला शेअर्सवर डिव्हिडंडची संधी
November 02, 2026
Mangaluru man converts his two-wheeler into a mobile tyre puncture repair shop to help stranded motorists.
Mobile Puncture Repair Shop : चालत्या - बोलत्या पंक्चर दुकानाची कमाल
November 02, 2026
Karbonn Rebel and Karbonn Rebel Pro smartphones launched in India with 7000mAh battery and 64MP camera.
भारतीय बाजारात १३ हजारांपेक्षा कमी किमतीत 'कार्बन'चे दोन स्मार्टफोन लॉन्च, ७००० एमएएच बॅटरीसह मिळणार खास फीचर्स
November 02, 2026