LIVE UPDATES

Flipkart Big Billion Days Sale: १५ हजारांपेक्षा कमी किमतीत ५ दमदार स्मार्टफोन्स, पाहा फीचर्स अन् किंमत

Best Smartphones Under ₹15,000 : जर तुम्ही 'फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल' दरम्यान नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट १५ हजार रुपयांच्या आत असेल तर तुम्ही काही बजेटमधील स्मार्टफोन्सचा विचार करू शकता. फ्लिपकार्टचा हा सेल ९ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी सुरू झाला आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 09, 2026 15:43 PM
views 197  views
Best smartphones under ₹15,000 available during Flipkart Big Billion Days Sale

नवी दिल्ली : जर तुम्ही 'फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल' दरम्यान नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट १५ हजार रुपयांच्या आत असेल तर तुम्ही काही बजेटमधील स्मार्टफोन्सचा विचार करू शकता. फ्लिपकार्टचा हा सेल ९ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी सुरू झाला आहे. या सेलदरम्यान लावा विराट व्ही 1 (Lava Virat V1), लावा विराट व्ही 1 5 जी (Lava Virat V1 5G), लावा व्हिराट व्ही 1 प्रो 5 जी (Lava Virat V1 Pro 5G), टेक्नो स्पार्क गो 3 (Tecno SPARK Go 3) आणि मोटो जी 06 पॉवर (Moto g06 Power) यांसारखे स्मार्टफोन्स १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्ट सेलमध्ये लावा विराट व्ही 1 (Lava Virat V1) चा बेस व्हेरिएंट ८,९९९ रुपयामंध्ये खरेदी करता येणार आहे. लावा विराट व्ही 1 मध्ये ६.७५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. जो ९० हर्टझ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज आणि ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड १५ (Android 15) वर चालतो.

पुढचा फोन लावा विराट व्ही 1 5जी आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये याची सुरुवातीची किंमत ११,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये १२० हर्टझ रिफ्रेश रेटसह ६.७५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. यात यूनिसॉक टी 8200 (Unisoc T8200) प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि ६००० एमएएचची बॅटरी आहे. तसेच, याला आयपी 64 रेटिंगही मिळाले आहे.

फ्लिपकार्ट सेलमध्ये स्पार्क गो 3 (SPARK Go 3) चा बेस व्हेरिएंट १०,९९९ रुपयांना खरेदी करु शकता. टेक्नो स्पार्क गो 3 मध्ये ६.७५ इंचाची १२० हर्टझ स्क्रीन आहे. यात टी 7250 प्रोसेसर, १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ५००० एमएएच बॅटरी आणि १५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यात बाजूला साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधाही देण्यात आली आहे.

फ्लिपकार्टच्या 'बिग बिलियन डेज' सेलदरम्यान, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला 'Mivi One 5G' व्हेरिएंट १४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन 'क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २' (Qualcomm Snapdragon 4 Gen 2) प्रोसेसरवर चालतो. यात ५० एमपीचा (MP) रिअर कॅमेरा आणि ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, यात १८ वॉट (18W) चार्जिंगला सपोर्ट करणारी ६००० mAh ची बॅटरी आहे.

फ्लिपकार्ट सेलमध्ये बँक ऑफर्ससह हा फोन १३,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. मोटो जी 06 पॉवर मध्ये 'गोरिला ग्लास ३' (Gorilla Glass 3) चे प्रोटेक्शन असून ६.८८ इंचाचा एचडी प्लस १२० हर्ट्झ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 'मीडियाटेक हेलिओ जी 81 एक्सट्रीम' (MediaTek Helio G81 Extreme) प्रोसेसरवर चालतो. यात ५० एमपीचा रिअर कॅमेरा आणि ८ एमपीचा सेल्फी कॅमेऱ्याचा समावेश आहे. याची ७००० एमएएचची बॅटरी १८ वॉट चार्जिंगला सपोर्ट करते आणि हा फोन आयपी 64 रेटेड आहे.