
नवी दिल्ली : 'ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' आणि 'फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज २०२६' ची सुरुवात झाली आहे. दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर, स्मार्टवॉच, इअरबड्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देत आहेत.
बँक कार्ड डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस, नो-कॉस्ट ईएमआय (EMI) पर्याय, कॅशबॅक आणि प्लॅटफॉर्म रिवॉर्ड्स यांचा ग्राहक लाभ घेऊन काही प्रॉडक्टस आणखी कमी किमतीत खरेदी करता येऊ शकतात.
'फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज २०२६' सेलचा 'अर्ली ॲक्सेस' ८ ऑक्टोंबरपासून फ्लिपकार्ट प्लस आणि व्हीआयपी मेंबरशीप तसेच फ्लिपकार्ट क्रेडिट कार्डधारकांसाठी सुरू झाला आहे. तर सर्व ग्राहकांसाठी हा सेल ९ ऑक्टोबरपासून खुला होईल. फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्ड्सचा वापर करून केलेल्या विशिष्ट व्यवहारांवर १० टक्क्यांपर्यंतचा इन्स्टंट डिस्काऊंट (instant discount) उपलब्ध आहे.
'ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' मध्ये एसबीआय (SBI) क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर १० टक्के इन्स्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. ही ऑफर क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांनाही लागू आहे, तरीही विशिष्ट उत्पादन आणि व्यवहारानुसार अटी व शर्ती बदलू शकतात.
ॲक्सिस बँकेने 'फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज' सेलसाठी आपल्या क्रेडिट कार्ड्सवर १० टक्के इन्स्टंट डिस्काऊंट देण्याची पुष्टी केली आहे. ही ऑफर विशिष्ट प्रॉडक्टसवरील नॉन-ईएमआय आणि ईएमआय अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांना लागू आहे. यामध्ये मिळणारा जास्तीत जास्त लाभ हा उत्पादन आणि कार्डच्या पात्रतेवर अवलंबून असेल. काही कॅटेगरीमध्ये अतिरिक्त कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.
फ्लिपकार्ट 'सुपरमनी' द्वारे पहिल्या पात्र व्यवहारावर १० टक्के डिस्काऊंट, फ्लिपकार्ट ईएमआय व्यवहारांवर अतिरिक्त फायदे आणि यूपीआय वापरून फ्लिपकार्ट डिजिटल गिफ्ट कार्ड्स खरेदी करताना ५ टक्क्यांपर्यंत बचत यांसारखे पर्यायही देत आहे. दरम्यान, या ऑफर्ससाठी पात्रता निकष आणि सवलतीची कमाल मर्यादा वेगवेगळी असू शकते.
'ॲमेझॉन पे आयसीआयसीआय बँक' क्रेडिट कार्डधारकांना ॲमेझॉनवर अतिरिक्त फायदे मिळतात. या कार्डचा वापर करून ॲमेझॉनवर केलेल्या पात्र खरेदीवर 'प्राइम' (Prime) मेंबर्स अनलिमिटेड ५ टक्के कॅशबॅक मिळवू शकतात, तर 'नॉन-प्राइम' ग्राहकांना ३ टक्के कॅशबॅक मिळतो.
एसबीआय कार्डच्या १० टक्के इन्स्टंट डिस्काऊंटच्या ऑफरला 'ॲमेझॉन पे आयसीआयसीआय' कार्ड हा अनेकदा एक उत्तम पर्याय ठरतो. दरम्यान, ज्या प्रॉडक्टसवर १० टक्क्यांचे पूर्ण एसबीआय इन्स्टंट डिस्काउंट लागू होते, तिथे एसबीआय कार्ड वापरणे हाच अधिक चांगला पर्याय ठरतो.
'प्राइम' ग्राहकांना ॲमेझॉनवर अतिरिक्त फायदेही मिळतात. ॲमेझॉनच्या माहितीनुसार, प्राइम सदस्य 'ॲमेझॉन पे आयसीआयसीआय कार्ड'द्वारे ५ टक्के कॅशबॅक मिळवू शकतात आणि त्यासोबतच या वर्षी विविध पात्र उत्पादनांवर अतिरिक्त बचतही करू शकतात. त्यामुळे, प्राइम मेंबर्स आणि ॲमेझॉन पे आयसीआयसीआय कार्ड या दोन्ही गोष्टी जवळ असणे मोठ्या बचतीसाठी फायदेशीर ठरू शकते.














