LIVE UPDATES

साळशी येथील वृध्देने गळफास लावून केली आत्महत्या

चिकूच्या झाडाला साडीच्या सहाय्याने लावला गळफास : आत्महत्येचे कारण अस्पष्ट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 09, 2026 20:39 PM
views 41  views

देवगड : घरालगत असलेल्या चिकूच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास लावुन साळशी गावकरवाडी येथील वृध्द महिलेने आत्महत्या केली. प्रतिभा शंकर लाड (77) असे वृध्देचे नाव असून ही घटना शुक्रवार 9 ऑक्टाेबर राेजी सकाळी 9 वा सुमारास निदर्शनास आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, साळशी गावकरवाडी येथील प्रतिभा शंकर लाड या विभक्त राहत हाेत्या. त्यांची तीन घरे असून एका घरात त्या राहत हाेत्या. तर दुसऱ्या घरात त्यांची सुन पुजा प्रसाद लाड राहते. घरी रात्री जेवण झाल्यानंतर त्या शेजारी झाेपण्यास जात असत. सकाळी त्या राहत असलेल्या घराच्या वरच्या बाजुला असलेल्या चिकूच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी 9 वा. सुमारास तेथील एका ग्रामस्थांच्या ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रतिभा लाड यांची सुन पुजा लाड यांना सांगीतले.

याबाबत पुजा लाड यांनी देवगड पाेलिस स्थानकात खबर दिली. घटनेची माहिती समजताच सहाय्यक पाेलिस निरिक्षक संताेष उगलमुगले, पाे.हे.काॅ.महेंद्र महाडिक, महिला पाे.हे.काॅ.अन्विता कदम, पाे.काॅ.प्रसाद आचरेकर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. देवगड पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली असून पाे.हे.काॅ.महेंद्र महाडिक तपास करीत आहेत. त्यांचा पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.