
सिंधुदुर्ग : डिलिमिटेशन म्हणजे लोकसंख्येतील बदलानुसार लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा व जागांची संख्या नव्याने निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून संसदेच्या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. सध्या देशात आणि महाराष्ट्रात यावर मोठी राजकीय चर्चा सुरू असून डिलिमिटेशननंतर कोकणातील खासादर अन् आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे कशी बदलतात ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या तिनं आमदार व रत्नागिरी व सिंधुदुर्ग मतदारसंघातून एक खासदार अशी रचना आहे. डिलिमिटेशन नंतर यात बदल होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. कारण, महाराष्ट्रातील खासदार अन् आमदारांची संख्या वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर तळकोकणात राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः सावंतवाडी मतदारसंघात अधिक चर्चा होत आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार दीपक केसरकर आहेत. गेले चार टर्म ते इथून प्रतिनीधीत्व करत आहेत. यातच डिलिमिटेशनंतर या मतदारसंघात प्रामुख्याने बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने आमदार दीपक केसरकर यांच्यासह नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उभे असणारे राजन तेली, विशाल परब, अर्चना घारे-परब यांसह संजू परब, मनिष दळवी, रूपेश राऊळ आदींसह विविध नेतेमंडळीची नाव चर्चेत आहे. मतदारसंघ पुनर्रचना कशी होते त्यावर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. डिलिमिटेशन नंतर तळकोकणात राजकारणाला मोठी रंगत येणार आहे.
युवा नेते विशाल परब यांच्या भुमिकेकडे लक्ष
यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब पक्षात सक्रियपणे कार्यरत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विशाल परब यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची लक्षणीय मते मिळवून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. यातच ते लोकसभेसाठी देखील इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर युवा नेते विशाल परब नेमकी कोणती भूमिका घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








