LIVE UPDATES

Smartphone Security Tips : फोन हॅक कसा होतो ?

आपल्‍याला हे माहिती आहे का ?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 25, 2026 07:50 PM
views 64  views
Smartphone cybersecurity awareness showing mobile phone protection against hackers, data theft and online banking fraud.

नवी दिल्ली : आपल्या हातातला स्मार्टफोन आज आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल बनला आहे. बँकेचे व्यवहार, खासगी फोटो, चॅट्स, लोकेशन... सगळं काही एका खिशात आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा हा फोन खरंच फक्त तुमचा आहे का? की कोणीतरी दुरून तुमच्यावर लक्ष ठेवून आहे? 

अनेकांना वाटतं, 'मी कोण मोठा सेलिब्रिटी किंवा मोठा अधिकारी आहे की माझा फोन हॅक करेल?' पण सायबर गुन्हेगारांसाठी तुम्ही कोण आहात यापेक्षा तुमच्याकडे कोणता डेटा आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं. तुमच्या बँक खात्यातील रक्कम, UPI पिन किंवा क्रेडिट कार्डची माहिती मिळवणं हा मुख्य उद्देश असतो. 

खासगी फोटो, व्हिडिओ किंवा संवेदनशील माहिती मिळवून पैशांची मागणी करणं. तुमचा नंबर किंवा ओळख वापरून तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना मेसेज पाठवणं. थोडक्यात सांगायचं तर, आजच्या काळात डेटा हेच सर्वात मोठं चलन आहे आणि फोन हा त्या डेटाचा खजिना." 'तुमचं बँक खातं बंद पडणार आहे', 'लॉटरी लागली आहे' किंवा 'कुरिअर अडकलं आहे' अशा मेसेजमधील लिंकवर क्लिक करणं. तिथे टाकलेली माहिती थेट हॅकर्सकडे जाते. 

अधिकृत स्टोअरऐवजी अनोळखी लिंकवरून ॲप्स डाऊनलोड करणं किंवा नको त्या परवानग्या जसं की कॉन्टॅक्ट्स, मेसेज, कॅमेरा किंवा ॲक्सेसिबिलिटी देणं. रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा कॅफेमधील असुरक्षित मोफत वाय-फाय वापरताना पासवर्ड किंवा महत्त्वाचे व्यवहार करणं. फोनचं ऑपरेटिंग सिस्टीम किंवा सिक्युरिटी अपडेट्स वेळेवर न करणं.

जुन्या व्हर्जनमधील त्रुटींचा हॅकर्स फायदा घेतात. "तंत्रज्ञान वाईट नाही, पण असावधानता महागात पडू शकते. प्रत्येक लिंकवर विश्वास न ठेवणं, मजबूत पासवर्ड आणि टू-स्टेप व्हेरिफिकेशन वापरणं, आणि वेळोवेळी अपडेट्स करणं हेच आपलं पहिलं सुरक्षाकवच आहे. तुमच्या मते, आजच्या काळात सर्वात मोठा धोका कोणता आहे अज्ञान की अतिआत्मविश्वास?

संकलन - स्वप्निल परब

मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद



ताजी बातमी

View all

नेरूर देसाईवाडीत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
November 25, 2026
‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत २०४७’ संकल्पनेतून संविधान दिन साजरा
November 25, 2026
देवगड किल्ला परिसरात गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा
November 25, 2026
Kankavli Land Dispute Assault Case : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत हाणामारी
November 25, 2026
संबंधित बातम्या

View all

Reliance Jio ₹15 data add-on recharge plan with 24-hour unlimited 5G data
जिओचा धमाका! फक्त १५ रुपयांत २४ तास अनलिमिटेड 5G डेटा; २५ आणि ५० रुपयांचेही नवे प्लॅन लॉन्च
November 24, 2026
IRCTC introduces a new limited food menu in Vande Bharat Sleeper trains
IRCTC Food : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आयआरसीटीसीचा जेवणाचा मेनू बदलला; जाणून घ्या नवे पर्याय
November 24, 2026
TVS Jupiter 110 Dual-Tone scooter new top-end variant in India
टीव्हीएस ज्यूपिटर 110 स्पेशल एडिशन बंद; आता 'ड्यूअल टोन व्हेरिअंट' टॉप मॉडेल, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sheikh Hasina return to Bangladesh : शेख हसीना यांचे बांगलादेशात पुनरागमन ?
November 24, 2026