LIVE UPDATES

ग्रामपंचायतीचा एक रुपयाही खर्च करू नका

खर्च झाल्यास गप्प बसणार नाही | गुरुदास गवंडे यांचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 29, 2026 08:24 PM
views 58  views

बांदा :  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत २ डिसेंबर २०२६ रोजी वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळा आणि पुरस्कार वितरण सोहळ्याच्या खर्चावरून स्वराज्य सरपंच संघटनेचे माजी सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरपंचांनी प्रशिक्षण घ्यावे, पुरस्कार स्वीकारावेत, अभियानात सहभागी व्हावे ; मात्र त्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतील, स्वनिधीतील किंवा अन्य कोणत्याही निधीतील एक रुपयाही खर्च करू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

कोकण विभागीय आयुक्तांनी कार्यशाळेसंदर्भात दिलेल्या पत्रामध्ये या कार्यक्रमाचा खर्च नेमका कोणत्या निधीतून करायचा, याबाबत स्पष्ट उल्लेख आहे का? ग्रामपंचायतींनी खर्च करायचा की शासनाने त्यासाठी स्वतंत्र तरतूद करायची, याबाबत स्पष्ट आदेश का देण्यात आलेले नाहीत? असा सवाल गवंडे यांनी उपस्थित केला आहे.

प्रशिक्षण घ्या, पुरस्कार घ्या ; पण ग्रामपंचायतीचा पैसा खर्च करू नका !

सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी जावे, शासनाच्या अभियानात सहभागी व्हावे, पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहावे, याला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून अथवा ग्रामनिधीतील किंवा अन्य कोणत्याही निधीतून प्रवास, निवास, भोजन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यात येऊ नये. कार्यशाळेला आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाने घ्यावी अशी आमची ठाम भूमिका आहे, असे गवंडे यांनी स्पष्ट केले.




ताजी बातमी

View all

रेल्वे प्रवासात अल्पवयीन मुलीची छेडछाड
November 29, 2026
दरडोई उत्पन्नात दरवर्षी ५० हजारांची वाढ करण्याचे लक्ष्य
November 29, 2026
डॉ. रमाकांत गावडे यांना इंडोनेशियात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
November 29, 2026
रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्ययंत्रणेच्या शिरपेचात मानाचा तुरा
November 29, 2026
संबंधित बातम्या

View all

रेल्वे प्रवासात अल्पवयीन मुलीची छेडछाड
November 29, 2026
दरडोई उत्पन्नात दरवर्षी ५० हजारांची वाढ करण्याचे लक्ष्य
November 29, 2026
डॉ. रमाकांत गावडे यांना इंडोनेशियात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
November 29, 2026
रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्ययंत्रणेच्या शिरपेचात मानाचा तुरा
November 29, 2026