LIVE UPDATES

MSRTC Employees Protest : एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संयुक्त कृती समितीचा एल्गार

१० डिसेंबरला राज्यव्यापी धरणे व निदर्शने आंदोलन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 07:19 PM
views 172  views
MSRTC employees protest against privatization and outsourcing policies in Maharashtra on December 10.

कणकवली : एसटी महामंडळाचे अस्तित्व, कर्मचाऱ्यांचे भविष्य आणि प्रवाशांच्या सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवेच्या रक्षणासाठी संयुक्त कृती समितीने आंदोलनाची हाक दिली आहे. विविध मुद्द्यांवर या आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.

संयुक्त कृती समितीच्या आंदोलनातील मुद्दे पुढीलप्रमाणे असणार आहेत. ५,१५० ई-बसेस खाजगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेण्याचे धोरण रद्द करून महामंडळाने स्व:मालकीच्या इलेक्ट्रीक बस खरेदी कराव्यात. सुमारे ३,५०० एकर मोक्याच्या जमिनी ९९ वर्षांच्या PPP तत्वावर देण्याचा निर्णय रद्द करुन महामंडळाने स्वतः हुन जागा विकसित कराव्यात.

चालक, व तांत्रिक कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी भरती बंद करून आउटसोर्सिंगद्वारे कर्मचारी नेमण्याच्या धोरणाला विरोध आहे, त्यामुळे कंत्राटी नोकर भरती न करता नियमित नोकर भरतीला परवानगी द्यावी. ऐतिहासिक मध्यवर्ती कार्यशाळा बंद करून खासगी संस्थांना काम देण्याच्या निर्णयाला विरोध असून  मध्यवर्ती कार्यशाळेतील कुशल कामगारांमार्फत नविन बस बांधनीला प्रोत्साहन द्यावे.

कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या मान्य कराव्यात,सन २०१६ पासून १ टक्के प्रलंबित वेतनवाढ फरक व घरभाडे भत्ता फरक, २०१८ पासूनची महागाई भत्ता थकबाकी आणि १०, २०, ३० टक्के वेतनवाढीच्या फरकासह प्रलंबित आर्थिक प्रश्न तातडीने मार्गी लावा अशा प्रमुख मागण्या आहेत.

१० डिसेंबर रोजी राज्यातील सर्व विभागीय कार्यालयांसमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे .ही लढाई केवळ कर्मचाऱ्यांच्या हक्कांची नाही, तर एसटीच्या भविष्याची आहे. तरी या आंदोलनात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन एकजूट दाखवावी असे आवाहन महाराष्ट्र एसटी कामगार सेना, संयुक्त कृती समिती तर्फे करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

chiplun-indian-pangolin-rescue-khersheth.jpg
Chiplun Pangolin Rescue : खेरशेतमध्ये दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान
November 28, 2026
Mumbai-Goa Highway Accident : कोंडमळा येथे उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक
November 28, 2026
Karivade Maruti Temple built on a giant rock beside a river in Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra.
Karivade Maruti Temple : नदीच्या पात्रात अजस्त्र खडकावर उभं मारुती मंदिर
November 28, 2026
vedant-pophale-modern-pentathlon-state-level-selection.jpg
Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra primary teachers announce statewide agitation from December 1 against excessive administrative duties and pending education-related demands.
Maharashtra Primary Teachers Protest 2026 : १ डिसेंबरपासून शिक्षक प्रशासकीय व्हॉट्सऍप ग्रुपमधून बाहेर पडणार
November 28, 2026
Fly91 aircraft at Sindhudurg Airport after a technical issue disrupted the flight to Navi Mumbai, with passengers shifted to Mopa Airport in Goa.
Sindhudurg Airport Fly91 : सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवेत तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा
November 28, 2026
Maharashtra CM Relief Fund Social Stock Exchange Registration
CM Relief Fund Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर
November 27, 2026
 Shiv Sena MLA Nilesh Rane addresses a press conference in Malvan and comments on Supriya Sule CM rumours and Maharashtra political issues.
Nilesh Rane : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार?
November 27, 2026