
कणकवली : बिहार ते गोवा रेल्वे प्रवासादरम्यान टॉयलेटमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड काढून तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. ही घटना नांदगाव रेल्वे स्थानकादरम्यान शुक्रवार २७ नोव्हेंबरला मध्यरात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. पिडीतेच्या नातेवाईकांनी संशयित आरोपी अजितकुमार संजय नोनिया याला रंगेहाथ पकडून त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पिडीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी अजितकुमार संजय नोनिया (वय २१ रा. झारखंड) याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीनुसार, पिडीतेचे वडील व त्यांचे कुटुंबीय नोकरीनिमित्त गोव्यात राहतात. कामानिमित्त कुटुंबीय मूळ बिहार येथील गावी गेले होते.२७ नोव्हेंबरला रात्री ११.५५ वाजण्याच्या सुमारास बिहारहून रेल्वे गाडीने कुटुंबीय गोव्याकडे येण्यासाठी निघाले. १.४५ वाजण्याच्या सुमारास नांदगाव रेल्वे स्थानकादरम्यान पिडीता नैसर्गिक विधी करण्यासाठी टॉयलेटमध्ये गेली. त्यानंतर तिच्या अरडाओडीचा आवाज कुटुंबीयांना ऐकून आला. कुटुंबीय टॉयलेटजवळ गेले असता टॉयलेटचा दरवाजा बंद होता. कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. त्यानंतर टॉयलेटमध्ये असलेल्या व्यक्तीने दरवाजा उघडला तेव्हा पीडितेसोबत तो व्यक्ती आढळून आला.
पीडितेने तिच्याबाबतीत घडलेले गैरप्रकार कुटुंबीयांना सांगितला. क्षणाचा विलंब न करता कुटुंबीयांनी संशयित अजित कुमार संजय नोनिया (वय २१ रा. झारखंड) याला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अजित नोनिया याला पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








