LIVE UPDATES

व्हॉट्सॲपचे नवे भन्नाट फिचर! आता मॅसेजही करता येणार शेड्युल, जाणून घ्या सोपी पद्धत

WhatsApp Schedule Messages Feature : व्हॉट्सॲपचे शेड्युल मॅसेज हे फिचर पर्सनल आणि ग्रुपवरील मॅसेज अशा दोन्ही प्रकारच्या चॅट्समध्ये काम करेल. यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी ॲप किंवा दुसऱ्या कोणत्याही टूलची गरज नाही.
Edited by: Rajat Sawant
Published on: November 26, 2026 12:56 PM
views 222  views
WhatsApp Schedule Messages New Feature 2026

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप युजर्ससाठी एक अत्यंत उपयुक्त फिचर आणले आहे. यामुळे युजर आता मॅसेज पाठवण्यासाठी विशिष्ट तारीख आणि वेळ शेड्युल करू शकतात. मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सॲपने २५ नोव्हेंबर रोजी आपल्या अधिकृत ब्लॉगवर या फिचरची घोषणा केली. युजर्सकडून बऱ्याच काळापासून या फिचरची मागणी केली जात होती. हे नवीन फिचर केवळ टेक्स्ट मॅसेजपुरती मर्यादित नसून युजर्स फोटो आणि व्हिडिओ देखील शेड्युल करू शकतात. यामुळे वाढदिवस, वर्धापनदिन आणि इतर विशेष प्रसंगी वेळेवर शुभेच्छांचे मॅसेज पाठवणे अधिक सोपे होणार आहे.

व्हॉट्सॲपचे शेड्युल मॅसेज हे फिचर पर्सनल आणि ग्रुपवरील मॅसेज अशा दोन्ही प्रकारच्या चॅट्समध्ये काम करेल. विशेष म्हणजे, यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी ॲप किंवा दुसऱ्या कोणत्याही टूलची गरज नाही. युजर्स १० मिनिटांपासून ते १४ दिवसांपर्यंतच्या कालावधीत मॅसेज शेड्युल करू शकतात. तसेच मॅसेज पाठवण्यापूर्वी युजर्स तो चेक करु शकतात. जर काही कारणास्तव युजरचा प्लॅन बदलला तर मॅसेज पोहोचण्यापूर्वी तो डिलीट केला जाऊ शकतो. मॅसेज आधीच शेड्युल केला होता हे मॅसेज रिसिव्ह करणाऱ्या व्यक्तीला समजणार नाही. तो मॅसेज अगदी नेहमीच्या व्हॉट्सॲप मॅसेजसारखाच दिसेल.

शेड्युल मॅसेज केल्यानंतर तुमच्या फोनची बॅटरी संपली किंवा फोन बंद असला तरीही तो मॅसेज पाठवला जाईल. व्हॉट्सॲपच्या म्हणण्यानुसार, शेड्युल केलेले मॅसेज सामान्य मॅसेजप्रमाणेच 'एंड-टू-एंड एन्क्रिप्शन'द्वारे सुरक्षित आहेत. हे फिचर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे सर्व युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी काही काळ लागू शकतो.

व्हॉट्सॲपवर मॅसेज असे करा शेड्युल 

  • व्हॉट्सॲपवर मॅसेज शेड्युल करणे अत्यंत सोपे आहे. यासाठी युजर्सना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
  • सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सॲप ओपन करा आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला शेड्युल मॅसेज पाठवायचा आहे त्यांचे चॅट ओपन करा. तुम्ही ग्रुप चॅटमध्येही मॅसेज शेड्युल करू शकता. चॅट ​​बॉक्समध्ये तुमचा मॅसेज टाईप करा. नेहमीप्रमाणे 'सेंड' बटण क्लिक करण्याऐवजी, ते बटण काही वेळ क्लिक करुन ठेवा.
  • असे केल्यावर तुम्हाला मॅसेज शेड्युल करण्याचा पर्याय दिसेल. त्यानंतर, तुमच्या पसंतीनुसार तारीख आणि वेळ निवडा. तारीख आणि वेळ निवडल्यानंतर तुमचा मॅसेज शेड्युल होईल आणि ठरवलेल्या वेळी तो आपोआप युजरला पाठवला जाईल.


ताजी बातमी

View all

Residents of Govalkot, Pethmap and Uktad staging a chain hunger strike outside Chiplun Municipal Council demanding clean drinking water.
Chiplun Water Crisis : स्वच्छ पाण्यासाठी चिपळूणकर आक्रमक
November 26, 2026
Vaibhavwadi Child Abuse Case : वैभववाडी तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचाराची सखोल चौकशी करावी
November 26, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
सावंतवाडी पंचायत समितीत संविधान दिन उत्साहात
November 26, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
देवगडात ‘असिस्टंट ज्यूट क्राफ्ट प्रॉडक्ट्स मेकर’ प्रशिक्षण वर्ग
November 26, 2026
संबंधित बातम्या

View all

Smartphone cybersecurity awareness showing mobile phone protection against hackers, data theft and online banking fraud.
Smartphone Security Tips : फोन हॅक कसा होतो ?
November 25, 2026
Reliance Jio ₹15 data add-on recharge plan with 24-hour unlimited 5G data
जिओचा धमाका! फक्त १५ रुपयांत २४ तास अनलिमिटेड 5G डेटा; २५ आणि ५० रुपयांचेही नवे प्लॅन लॉन्च
November 24, 2026
IRCTC introduces a new limited food menu in Vande Bharat Sleeper trains
IRCTC Food : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आयआरसीटीसीचा जेवणाचा मेनू बदलला; जाणून घ्या नवे पर्याय
November 24, 2026
TVS Jupiter 110 Dual-Tone scooter new top-end variant in India
टीव्हीएस ज्यूपिटर 110 स्पेशल एडिशन बंद; आता 'ड्यूअल टोन व्हेरिअंट' टॉप मॉडेल, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
November 24, 2026