LIVE UPDATES

मोदी सरकारचा मोठा निर्णय! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; राज्यांतील जागा ५० टक्क्यांनी वाढणार?

Delimitation Bill 2026 : मोदी सरकारची मंत्रिमंडळ बैठक सुमारे 40 मिनिटे चालली. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संसदेच्या आगामी कामकाजावर चर्चा करण्यात आली.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 27, 2026 04:30 PM
views 138  views
Modi Cabinet Approves Delimitation Bill 2026

नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि महिलाआरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकातील दुरुस्त्यांना कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मोदींच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामध्ये विविध राज्यांमधील जागांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यांमध्ये जागांच्या वाटपाची सध्याची व्यवस्था पुढील 25 वर्षांपर्यंत, म्हणजेच 2051 सालापर्यंत, कायम राहणार आहे.

याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार आणत असलेल्या डिलिमिटेशन बिलाला पाठींबा मिळावा यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासोबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा संपर्क केला असल्याची माहिती आहे. पुढील काही दिवसांत हे बिल आणले जात आहे, त्यावेळेस सर्व सहकार्य मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या नेत्यांसोबत संवाद करून शंका दूर करण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

मोदी सरकारची मंत्रिमंडळ बैठक सुमारे 40 मिनिटे चालली. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संसदेच्या आगामी कामकाजावर चर्चा करण्यात आली. सूत्रांनुसार, बैठकीत 'डीलिमिटेशन बिल' मंजूर करण्यात आले. याव्यतिरिक्त, महिला आरक्षणाशी संबंधित एक दुरुस्तीही मंजूर करण्यात आली आहे.

लोकसभा 30 नोव्हेंबर रोजी, तर राज्यसभा 2 डिसेंबर रोजी बोलावण्यात आली आहे. संसदेचे चार दिवसीय अधिवेशनामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे स्वतंत्र हिवाळी अधिवेशन नसून पावसाळी अधिवेशनाचाच पुढील भाग असणार आहे.

30 नोव्हेंबरपासून लोकसभेचे तर 2 डिसेंबरपासून राज्यसभेचे कामकाज सुरू होणार आहे. तर 3 डिसेंबरला अधिवेशनाचा समारोप होणार आहे. सरकारकडून अद्याप अधिवेशनाचा अधिकृत कामकाजाचा अजेंडा जाहीर झालेला नाही.


ताजी बातमी

View all

देवगडमध्ये व्यावसायिकांसाठी एफडीए परवाना नूतनीकरण विशेष कॅम्प
November 27, 2026
Kiran Waghmare Honoured for Sagarkavach Coastal Security Exercise
देवगडचे मत्स्यपरवाना अधिकारी किरण वाघमारे यांचा राज्यस्तरीय गौरव
November 27, 2026
Sawantwadi Moti Lake Pollution Fine
Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
November 27, 2026
Archana Sawant Teachers Council Appointment
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकार्यवाहपदी अर्चना सावंत यांची निवड
November 27, 2026
संबंधित बातम्या

View all

Gold jewellery weighing 121 kg worth Rs 206 crore donated by Chennai Jain couple to Tirupati Balaji Temple.
Tirupati Balaji Gold Donation : तिरुपती बालाजीच्या चरणी 121 किलो सोन्याचे दागिने दान करण्यामागे 'हे' आहे कारण; किंमत पाहून व्हाल थक्क
November 27, 2026
WhatsApp Schedule Messages New Feature 2026
व्हॉट्सॲपचे नवे भन्नाट फिचर! आता मॅसेजही करता येणार शेड्युल, जाणून घ्या सोपी पद्धत
November 26, 2026
Smartphone cybersecurity awareness showing mobile phone protection against hackers, data theft and online banking fraud.
Smartphone Security Tips : फोन हॅक कसा होतो ?
November 25, 2026
Reliance Jio ₹15 data add-on recharge plan with 24-hour unlimited 5G data
जिओचा धमाका! फक्त १५ रुपयांत २४ तास अनलिमिटेड 5G डेटा; २५ आणि ५० रुपयांचेही नवे प्लॅन लॉन्च
November 24, 2026