LIVE UPDATES

Farmers Drought Relief 2026 : दुष्काळग्रस्त ३८ हजार १५ शेतकऱ्यांच्या खात्यात १९ कोटींची मदत जमा

जिल्ह्यातील ५१ हजार १०५ शेतकरी मदतीसाठी पात्र; उर्वरित शेतकऱ्यांना मदत वितरणाची कार्यवाही शासन स्तरावरून प्रगतीपथावर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 02:02 PM
views 91  views
sindhudurg-farmers-drought-relief-2026-compensation.jpg

सिंधुदुर्गनगरी : सन २०२६ च्या खरीप हंगामात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ हजार १५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आतापर्यंत १९ कोटी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ५१ हजार १०५ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिरायत व फळपीक क्षेत्रासाठी कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण २६ हजार ५६५.७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये ५१ हजार १०५ शेतकरी बाधित झाले असून, त्यांच्यासाठी २३ कोटी ११ लाख ४ हजार २८४ रुपयांचा अपेक्षित निधी निश्चित करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी शासन निर्णयानुसार २८ ऑक्टोबर २०२६ पासून ई-पंचनामा पोर्टलद्वारे मदत वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली. पोर्टलवरील उपलब्ध आकडेवारीनुसार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ४१ हजार २५१ शेतकऱ्यांची माहिती शासन स्तरावरून पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी ३८ हजार १५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण १९ कोटी ७५ हजार रुपयांची मदत जमा झाली आहे.

पोर्टलवर माहिती अपलोड झालेल्या मात्र बँक खात्यात मदतीची रक्कम जमा न झालेल्या ३ हजार २३६ शेतकऱ्यांची प्रकरणे प्रक्रियेत आहेत. तसेच अद्याप पोर्टलवर माहिती अपलोड न झालेल्या ९ हजार ८५४ शेतकऱ्यांची माहिती फार्मर आइडी निघाल्यानंतर शासनस्तरावरून अपलोड केली जात आहे. काही शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्याप तयार झालेले नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधून फार्मर आयडी काढून घेण्याबाबत आवाहन केले जात आहे.

शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढल्यानंतर पोर्टलवरील शासनस्तरावरून माहिती अद्ययावत होऊन पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये मदतीची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तो तातडीने काढून घ्यावा. तसेच बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्याची आवश्यक कार्यवाही संबंधित बँकेशी संपर्क साधून पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

उर्वरीत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तसेच बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्याची कार्यवाही करण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार, दोडामार्ग तालुक्यातील १ हजार ७३० शेतकरी मदतीसाठी पात्र असून १ हजार १०९ शेतकऱ्यांना मदत वितरित झाली आहे. सावंतवाडी तालुक्यातील ६ हजार ४६६ शेतकरी पात्र असून, ५ हजार ३४२ शेतकऱ्यांना मदत वितरित झाली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील २ हजार ९१९ शेतकरी मदतीसाठी पात्र असून, २ हजार ३४६ शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे.

कुडाळ तालुक्यातील १३ हजार ३५८ शेतकरी पात्र असून, १० हजार ७८१ शेतकऱ्यांना मदत वितरित झाली आहे. मालवण तालुक्यातील ७ हजार ७५७ शेतकरी पात्र असून, ५ हजार २४८ शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. कणकवली तालुक्यातील ८ हजार ७१२ शेतकरी पात्र असून, ६ हजार ३९७ शेतकऱ्यांना मदत वितरित झाली आहे. देवगड तालुक्यातील ६ हजार २९० शेतकरी पात्र असून, ३ हजार ९८९ शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. वैभववाडी तालुक्यातील ३ हजार ८७३ शेतकरी पात्र असून, २ हजार ८०३ शेतकऱ्यांना मदत वितरित झाली आहे.

एकूण जिल्ह्यातील ५१ हजार १०५ पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत ३८ हजार १५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये मदतीची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तसेच बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्याची कार्यवाही करण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.
Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026
सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची कारवाई
November 28, 2026
Sindhudurg District Collector Trupti Dhodmise inspects proposed earthen check dam sites on the Terekhol River to address summer water scarcity.
Sindhudurg Water Shortage : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे
November 28, 2026
एकपात्री अभिनय स्पर्धेचे सुदन कवठणकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg District Collector Trupti Dhodmise inspects proposed earthen check dam sites on the Terekhol River to address summer water scarcity.
Sindhudurg Water Shortage : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे
November 28, 2026
एकपात्री अभिनय स्पर्धेचे सुदन कवठणकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
November 28, 2026
भालावल येथे संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न
November 28, 2026
MLC Dnyaneshwar Mhatre meets Prajakt Chavan in Kankavli as the new Sindhudurg district executive committee of Shivchhatrapati Teachers Association is announced.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी चर्चा
November 28, 2026