LIVE UPDATES

Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई

तलाव काठी कचरा टाकणाऱ्यांनाही न.प.चा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 27, 2026 08:26 PM
views 77  views
Sawantwadi Moti Lake Pollution Fine

सावंतवाडी : शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक मोती तलावात अग्निशामक यंत्राची पावडर टाकून तलावाचे पाणी प्रदूषित केल्याप्रकरणी 'कर्नाटक फायर अँड सेफ्टी' या कंपनीवर २ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेचे प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत दिलेल्या आदेशानुसार आरोग्य विभागाने ही धडक कारवाई केली. तसेच तलावाकाठी कचरा टाकणऱ्यांना देखील कारवाईचा इशारा दिला आहे.

मोती तलावाच्या पाण्यात अग्निशामक यंत्रातील पावडर टाकण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांत संताप व्यक्त झाला होता. याची प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी तात्काळ दखल घेत संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पालिकेचे आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी 'कर्नाटक फायर अँड सेफ्टी' कंपनीला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईसोबतच नगरपरिषद प्रशासनाने शहरातील नागरिक व व्यावसायिकांना कडक इशारा दिला आहे.

मोती तलावात कोणत्याही प्रकारचा कचरा फेकणाऱ्यांसह, तलाव काठच्या कचरा पेट्यांमध्ये तसेच निर्माल्य कलशामध्ये घरगुती कचरा टाकणाऱ्यांवरही यापुढे कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तलावात सांडपाणी सोडणाऱ्यांना देखील यापूर्वी नोटीसा बजावल्या असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर घरगुती कचरा हा घंटा गाडीस देण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून तलावाचे स्वच्छता अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

देवगडमध्ये व्यावसायिकांसाठी एफडीए परवाना नूतनीकरण विशेष कॅम्प
November 27, 2026
Kiran Waghmare Honoured for Sagarkavach Coastal Security Exercise
देवगडचे मत्स्यपरवाना अधिकारी किरण वाघमारे यांचा राज्यस्तरीय गौरव
November 27, 2026
Archana Sawant Teachers Council Appointment
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकार्यवाहपदी अर्चना सावंत यांची निवड
November 27, 2026
Maharashtra CM Relief Fund Social Stock Exchange Registration
CM Relief Fund Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर
November 27, 2026
संबंधित बातम्या

View all

देवगडमध्ये व्यावसायिकांसाठी एफडीए परवाना नूतनीकरण विशेष कॅम्प
November 27, 2026
Kiran Waghmare Honoured for Sagarkavach Coastal Security Exercise
देवगडचे मत्स्यपरवाना अधिकारी किरण वाघमारे यांचा राज्यस्तरीय गौरव
November 27, 2026
Archana Sawant Teachers Council Appointment
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकार्यवाहपदी अर्चना सावंत यांची निवड
November 27, 2026
Teacher MLA Dnyaneshwar Mhatre meets Sindhudurg Zilla Parishad President Pramod Kamat to discuss education issues.
सिंधुदुर्गातील शिक्षकांच्या प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद अध्यक्षांशी चर्चा
November 27, 2026