LIVE UPDATES

December 2026 Movie Releases : सलमान, शाहरुख आणि श्रद्धा कपूरचे डिसेंबरमध्ये 'हे' चित्रपट होणार प्रदर्शित; पाहा ११ चित्रपटांची यादी

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 27, 2026 02:49 PM
views 135  views
Salman Khan, Shah Rukh Khan and Shraddha Kapoor films among the major Bollywood movie releases scheduled for December 2026.

नवी दिल्ली : येत्या डिसेंबर २०२६ मध्ये ४ थ्रिलर, ५ ड्रामा आणि २ चरित्रपट असे एकूण अकरा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या आगामी चित्रपटांच्या यादीत सलमान खान, श्रद्धा कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या बड्या कलाकारांच्या चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी भिडणार आहेत. काही चित्रपट संघर्ष टाळण्यासाठी त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलू शकतात. 

सलमान खानचा मातृभूमी (Maatrubhumi: May War Rest in Peace) हा चित्रपट वॉर ड्रामावर असून गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. सुरुवातीला 'बॅटल ऑफ गलवान' असे नाव असलेला हा चित्रपट एप्रिल २०२६ मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु आता त्याची तारीख बदलून ४ डिसेंबर, २०२६ करण्यात आली आहे.

श्रद्धा कपूरचा 'ईथा' (Eetha) हा चित्रपट महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला प्रकार लावणी आणि तमाशामधील ख्यातनाम कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट त्यांच्या वैयक्तिक संघर्षांवर, कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर आणि लावणीप्रती असलेल्या प्रेमावर प्रकाश टाकतो. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

'प्यादे' (Pyaade) हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. याची सुरुवात गंगा आरतीदरम्यान होणाऱ्या एका स्फोटाने होते. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

'मिस्टर अँड मिसेस ग्रे' (Mr. & Mrs. Grey) हा एक हिंदी ड्रामा-थ्रिलर चित्रपट आहे. याची कथा नातेसंबंधांमधील दडलेल्या रहसे, विश्वासघात आणि सस्पेन्स यांसारख्या विषयांचा भोवती फिरते. या चित्रपटात विवेक ओबेराय आणि नित्या मेनन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ११ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

'मैं ना रहा मेरा' (Main Na Raha Mera) ही एक हिंदी ड्रामा फिल्म असून यात अध्ययन सुमन आणि दिविता राय मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित कसारीया यांनी केले आहे. हा चित्रपट ११ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट (Ganesh: Dust to Stardust) बायोग्राफिकल ड्रामा चित्रपट असून तो प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट ११ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

शाहरुख खानचा 'किंग' (King) हा एक भव्य बजेट असलेला ॲडव्हेंचर-थ्रिलर चित्रपट आहे. याची कथा एक मार्गदर्शक आणि त्यांच्या शिष्या यांच्यातील संबंधांवर आधारित आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

'जुमानजी: ओपन वर्ल्ड' (Jumanji: Open World) हा 'जुमानजी' सिरिजमधील तिसरा चित्रपट आहे. यावेळी याची कथा आतापर्यंत पाहिलेल्या भागांपेक्षा काहीतरी वेगळी असेल. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.


ताजी बातमी

View all

Sawantwadi Moti Lake Pollution Fine
Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
November 27, 2026
Archana Sawant Teachers Council Appointment
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकार्यवाहपदी अर्चना सावंत यांची निवड
November 27, 2026
Maharashtra CM Relief Fund Social Stock Exchange Registration
CM Relief Fund Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर
November 27, 2026
Teacher MLA Dnyaneshwar Mhatre meets Sindhudurg Zilla Parishad President Pramod Kamat to discuss education issues.
सिंधुदुर्गातील शिक्षकांच्या प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद अध्यक्षांशी चर्चा
November 27, 2026
संबंधित बातम्या

View all

Netflix upcoming movies and web series releasing in November 2026
Netflix वर मनोरंजनाचा धमाका! नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणार ८ चित्रपट आणि वेब सीरिज, पाहा संपूर्ण यादी
November 24, 2026
Ramayan movie ₹99 ticket offer on Guru Parv
Ramayan Movie Tickets 99 Rupees : 'या' दिवशी 'रामायण' चित्रपट पहा फक्त ९९ रुपयांत, निर्मात्यांची खास ऑफर
November 24, 2026
Ormax Top 10 most popular Indian actors list October 2026 featuring Prabhas and Shah Rukh Khan
लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत प्रभास अव्वल; शाहरुख खान दुसऱ्या, सलमान खान कितव्या क्रमांकावर?
November 21, 2026
DARYAA short film directed by Kishor Arjun, selected for the 57th International Film Festival of India 2026.
DARYAA Short Film IFFI 2026 : कोकणचा ‘दर्या’ झळकणार इफ्फीच्या मंचावर
November 19, 2026