
नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना शुक्रवारी २७ नोव्हेंबर रोजी क्राइस्टचर्च येथे सुरू झाला. भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने ५ बाद २४६ धावा केल्या.
न्यूझीलंडचे दोन फलंदाज टॉम ब्लंडेल आणि टॉम लॅथम यांनी अर्धशतके झळकावली. टॉम लॅथमने ५९ धावा केल्या, तर ब्लंडेलने ५३ धावांचे योगदान दिले. ब्लंडेल अजूनही नाबाद आहे. भारतासाठी जसप्रीत बुमराहला एकही बळी मिळाला नाही, तर आकाश दीपने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत दोन बळी मिळवले. अंशुल कंबोजने एक बळी घेतला, तसेच पदार्पण करणाऱ्या गुरनूर ब्रारनेही एक बळी मिळवला.
फिरकी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरनेही एक बळी घेतला. टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी सहाव्या विकेटसाठी भागीदारी रचली असून, उद्या हे दोन्ही फलंदाज पुन्हा आपली खेळी पुढे सुरू ठेवतील.
मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा भारताच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात स्थान मिळाले नाही. या सामन्यासाठी संघात केवळ एक बदल करण्यात आला असून, प्रसिद्ध कृष्णाच्या जागी गुरनूर ब्रारला संधी देण्यात आली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडचे वर्चस्व राहिले.
भारताचा संघ
के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, आकाश दीप, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंडचा संघ
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, काईल जेमिसन, मॅट हेन्री, जेकब डफी
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








