LIVE UPDATES

देवगडचे मत्स्यपरवाना अधिकारी किरण वाघमारे यांचा राज्यस्तरीय गौरव

मंत्रालयात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते प्रशंसा प्रमाणपत्र प्रदान : ‘सागर कवच-०२/२६’ सुरक्षा कवायतीतील कामगिरीची दखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 27, 2026 08:35 PM
views 43  views
Kiran Waghmare Honoured for Sagarkavach Coastal Security Exercise

देवगड : महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘सागर कवच-०२/२६’ या संयुक्त किनारपट्टी सुरक्षा कवायतीमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल देवगडचे मत्स्यपरवाना अधिकारी किरण वाघमारे यांचा मुंबई येथील मंत्रालयात राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते त्यांना प्रशंसा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालय क्रमांक २, कोस्ट गार्ड डिस्ट्रिक्ट (महाराष्ट्र) यांच्या समन्वयाने ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर ‘सागर कवच-०२/२६’ ही सुरक्षा कवायत पार पडली होती. या कवायतीत भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र पोलीस, मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, सीमाशुल्क विभाग, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) यांसह विविध सुरक्षा यंत्रणांनी सहभाग घेतला होता.

सागरी मार्गाने उद्भवणाऱ्या संभाव्य सुरक्षा आव्हानांना प्रतिबंध करणे, किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणांची सज्जता तपासणे, संशयास्पद हालचालींबाबत माहितीची देवाणघेवाण करणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय वाढविणे हा या कवायतीचा प्रमुख उद्देश होता.

या कवायतीदरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने किरण वाघमारे यांनी सक्रिय सहभाग घेतला. मच्छीमार, नौकामालक आणि मासेमारी नौकांशी संबंधित घटकांमध्ये समन्वय साधणे, सागरी सुरक्षेसाठी आवश्यक माहिती व सहकार्य उपलब्ध करून देणे तसेच विविध सुरक्षा यंत्रणांशी संपर्क राखणे या कामांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या तत्परतेची, कर्तव्यनिष्ठेची आणि समन्वय कौशल्याची दखल घेत शासनाकडून त्यांना प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मंत्रालयात आयोजित या सन्मान सोहळ्यास गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध प्रशासकीय व सुरक्षा यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी किरण वाघमारे यांच्यासह ‘सागर कवच-०२/२६’ सुरक्षा कवायतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय तटरक्षक दल, पोलीस विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, सीमाशुल्क, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, NSG आणि CISF मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

सागरी सुरक्षा, मच्छीमारांमध्ये जनजागृती आणि विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधण्याच्या कार्याला मिळालेली ही राज्यस्तरीय पावती मानली जात आहे. किरण वाघमारे यांच्या या सन्मानामुळे देवगडच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विभागातील अधिकारी-कर्मचारी, मच्छीमार संस्था, नौकामालक आणि मच्छीमार बांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

Zolambe Villagers Protest Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ’ महामार्गाला झोळंबे ग्रामस्थांचा एकमुखी तीव्र विरोध
November 27, 2026
संविधानाची ताकद विधायक राष्ट्रनिर्माणासाठी वापरा : प्राचार्य समिर तारी
November 27, 2026
देवगडमध्ये व्यावसायिकांसाठी एफडीए परवाना नूतनीकरण विशेष कॅम्प
November 27, 2026
Sawantwadi Moti Lake Pollution Fine
Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
November 27, 2026
संबंधित बातम्या

View all

Zolambe Villagers Protest Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ’ महामार्गाला झोळंबे ग्रामस्थांचा एकमुखी तीव्र विरोध
November 27, 2026
संविधानाची ताकद विधायक राष्ट्रनिर्माणासाठी वापरा : प्राचार्य समिर तारी
November 27, 2026
देवगडमध्ये व्यावसायिकांसाठी एफडीए परवाना नूतनीकरण विशेष कॅम्प
November 27, 2026
Sawantwadi Moti Lake Pollution Fine
Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
November 27, 2026