
देवगड : देवगड तालुक्यातील ज्या व्यावसायिकांच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) परवान्यांची मुदत डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत संपणार आहे, अशा व्यावसायिकांसाठी विशेष परवाना नूतनीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, देवगड तालुका व्यापारी संघटना आणि देवगड तालुका महिला व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या कॅम्पमध्ये केवळ ९०० रुपये या अत्यल्प शुल्कात, कोणतीही धावपळ न करता परवाना उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी आपल्या परवान्याची मुदत आजच तपासून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा विशेष कॅम्प रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत देवगड तालुका व्यापारी संघ कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. देवगड तालुक्यातील सर्व व्यावसायिकांसाठी हा कॅम्प खुला असून, जास्तीत जास्त व्यावसायिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शैलेश कदम यांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








