LIVE UPDATES

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकार्यवाहपदी अर्चना सावंत यांची निवड

शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल; संघटनात्मक कामकाजाची महत्त्वपूर्ण जबाबदारी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 27, 2026 08:22 PM
views 27  views
Archana Sawant Teachers Council Appointment

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकार्यवाहपदी कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका अर्चना संतोष सावंत यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या आदेशान्वये ही निवड जाहीर करण्यात आली असून, जिल्हाध्यक्ष भरत केसरकर आणि कोकण कार्याध्यक्ष सलीम तकीलदार यांनी निवडीची घोषणा केली. अर्चना सावंत या शिक्षण क्षेत्रात सक्रिय असून, शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने कार्यरत आहेत.

विशेषतः विनाअनुदानित ते अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या प्रश्नांसह शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर त्यांनी वेळोवेळी भूमिका घेतली आहे. सावंतवाडी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची आणि योगदानाची दखल घेत शिक्षक परिषदेने त्यांच्यावर जिल्हा सहकार्यवाहपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत असलेली संघटना असून, जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक व्यापक व प्रभावी करण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संघटनात्मक बळकटीकरणावर भर दिला जात आहे. अर्चना सावंत यांच्या शैक्षणिक अनुभवाचा, कार्यतत्परतेचा आणि शिक्षक प्रश्नांवरील योगदानाचा संघटनेच्या कार्यविस्तारासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

अर्चना सावंत यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कोकण कार्याध्यक्ष सलीम तकीलदार, जिल्हा कार्यवाह नंदन घोगळे, कुडाळ तालुकाध्यक्ष सुरेश कुडाळकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


ताजी बातमी

View all

देवगडमध्ये व्यावसायिकांसाठी एफडीए परवाना नूतनीकरण विशेष कॅम्प
November 27, 2026
Kiran Waghmare Honoured for Sagarkavach Coastal Security Exercise
देवगडचे मत्स्यपरवाना अधिकारी किरण वाघमारे यांचा राज्यस्तरीय गौरव
November 27, 2026
Sawantwadi Moti Lake Pollution Fine
Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
November 27, 2026
Maharashtra CM Relief Fund Social Stock Exchange Registration
CM Relief Fund Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर
November 27, 2026
संबंधित बातम्या

View all

देवगडमध्ये व्यावसायिकांसाठी एफडीए परवाना नूतनीकरण विशेष कॅम्प
November 27, 2026
Kiran Waghmare Honoured for Sagarkavach Coastal Security Exercise
देवगडचे मत्स्यपरवाना अधिकारी किरण वाघमारे यांचा राज्यस्तरीय गौरव
November 27, 2026
Sawantwadi Moti Lake Pollution Fine
Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
November 27, 2026
Teacher MLA Dnyaneshwar Mhatre meets Sindhudurg Zilla Parishad President Pramod Kamat to discuss education issues.
सिंधुदुर्गातील शिक्षकांच्या प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद अध्यक्षांशी चर्चा
November 27, 2026