LIVE UPDATES

जिओचा धमाका! फक्त १५ रुपयांत २४ तास अनलिमिटेड 5G डेटा; २५ आणि ५० रुपयांचेही नवे प्लॅन लॉन्च

Jio 15 Rupees Data Plan : या छोट्या रिचार्ज पॅकचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात युजर्सना २४ तासांसाठी अनलिमिटेड ५जी डेटा मिळतो.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 24, 2026 06:50 PM
views 53  views
Reliance Jio ₹15 data add-on recharge plan with 24-hour unlimited 5G data

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी १५ रुपयांचा एक नवीन 'डेटा ॲड-ऑन' पॅक लॉन्च केला आहे. ज्या युजर्सना कमी कालावधीसाठी मोठ्या प्रमाणात इंटरनेट डेटाची आवश्यकता असते त्यांच्यासाठी कंपनीने हा पॅक तयार केला आहे. या छोट्या रिचार्ज पॅकचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात युजर्सना २४ तासांसाठी अनलिमिटेड ५जी डेटा मिळतो. त्यामुळे जर तुमचा दैनंदिन डेटा कोटा संपला असेल आणि तुम्हाला मोठ्या फाईल्स डाउनलोड करायच्या असतील, ऑनलाइन गेम्स खेळायचे असतील किंवा व्हिडिओ स्ट्रीम करायचे असतील तर हा प्लॅन अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

जिओच्या १५ रुपयांच्या डेटा ॲड-ऑन पॅकमध्ये एकदा रिचार्ज केल्यानंतर युजर्सना २४ तासांसाठी अनलिमिटेड ५जी इंटरनेट मिळते. या पॅकची व्हॅलिडिटी एक दिवस म्हणजेच २४ तास इतकी आहे.

तसेच, जिओने २५ रुपये आणि ५० रुपयांचे आणखी दोन डेटा ॲड-ऑन पॅकही आणले आहेत. २५ रुपयांच्या पॅकमध्ये युजर्सना ४८ तास अनलिमिटेड ५ जी डेटा मिळतो. यामध्ये डाउनलोडची कोणतीही मर्यादा, स्पीड थ्रॉटलिंग किंवा युसेज कॅप्सचे बंधन नसते. 

जे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात डेटा वापरतात त्यांच्यासाठी ५० रुपयांचा पॅक जारी करण्यात आला आहे. यामध्ये २८ दिवसांच्या कालावधीसाठी दररोज रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत अनलिमिटेड ४जी आणि ५जी डेटा मिळतो. युजर्स 'मायजिओ' ॲप किंवा जिओच्या वेबसाइटवरून हे पॅक खरेदी करू शकतात. याशिवाय, हे पॅक जिओ रिटेल स्टोअर्स, स्थानिक रिचार्ज शॉप्स आणि इतर थर्ड-पार्टी रिचार्ज प्लॅटफॉर्म्सवरही उपलब्ध आहेत. 



ताजी बातमी

View all

Forest Department seizes timber after illegal tree cutting at Talekhol Gadganjawadi in Dodamarg
Dodamarg Illegal Tree Cutting : तळेखोलमध्ये अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची कारवाई
November 24, 2026
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘हे चांदणे फुलांनी’ संगीत मैफल
November 24, 2026
Police investigation into suspected female foeticide case in Sakharpa, Ratnagiri
साखरप्यात स्त्रीभ्रृण हत्येचा संतापजनक प्रकार उघडकीस
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg News : बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य
November 24, 2026
संबंधित बातम्या

View all

IRCTC introduces a new limited food menu in Vande Bharat Sleeper trains
IRCTC Food : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आयआरसीटीसीचा जेवणाचा मेनू बदलला; जाणून घ्या नवे पर्याय
November 24, 2026
TVS Jupiter 110 Dual-Tone scooter new top-end variant in India
टीव्हीएस ज्यूपिटर 110 स्पेशल एडिशन बंद; आता 'ड्यूअल टोन व्हेरिअंट' टॉप मॉडेल, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sheikh Hasina return to Bangladesh : शेख हसीना यांचे बांगलादेशात पुनरागमन ?
November 24, 2026
West Bengal Assembly and proposed state name change to Paschim Banga.
पश्चिम बंगालचे नाव बदलणार? मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींची मोठी घोषणा, प्रस्ताव ९ डिसेंबरला मांडणार विधानसभेत
November 23, 2026