
सिंधुदुर्गनगरी : कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कुमार वेदांत विनायक पोफळे याने विभागस्तरीय शालेय मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
२३ नोव्हेंबर २०२६ रोजी सातारा येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात कोल्हापूर विभागस्तरीय शालेय मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत वेदांत पोफळे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चौथा क्रमांक पटकावला. या कामगिरीच्या जोरावर त्याची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वेदांतला जलतरण प्रशिक्षक प्रवीण सुलोकर व रनिंग कोच संकेत कदम यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धर्माई, क्रीडा अधिकारी माधुरी घराळ तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, शाळेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








