LIVE UPDATES

Sindhudurg Airport Fly91 : सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवेत तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा

प्रवाशांना लक्झरी बसने मोपा विमानतळावर हलविले; फ्लाय ९१च्या कारभाराबाबत नाराजी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 03:30 PM
views 717  views
Fly91 aircraft at Sindhudurg Airport after a technical issue disrupted the flight to Navi Mumbai, with passengers shifted to Mopa Airport in Goa.

म्हापण : नव्याने सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळावरून नवी मुंबई येथे जाणाऱ्या फ्लाय ९१ विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. हा बिघाड वेळेत दुरुस्त करणे शक्य न झाल्याने अखेर सर्व प्रवाशांना लक्झरी बसमधून गोव्यातील मोपा विमानतळावर नेण्यात आले. या प्रकारामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून, संबंधित विमानसेवेच्या नियोजनाबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गहून मुंबईला जाण्यासाठी प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते. विमानात बसल्यानंतर विमानातील वातानुकूलन यंत्रणा सुरू नसल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगण्यात आले. काही वेळानंतर पुन्हा प्रवाशांना विमानात बसविण्यात आले; मात्र तांत्रिक बिघाडाचे कारण देत दुसऱ्यांदा त्यांना विमानातून खाली उतरविण्यात आले.

 दरम्यान, विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी गोव्याहून अभियंत्यांना पाचारण करण्यात आले. मात्र, बिघाडाचे नेमके स्वरूप काय आहे आणि विमानाचे उड्डाण किती वेळाने होणार, याबाबत संबंधित यंत्रणेकडून प्रवाशांना स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

यासंदर्भात फ्लाय ९१ कंपनीशी संपर्क साधला असता, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना गोव्यातील मोपा विमानतळावर हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रवाशांना दुसऱ्या विमानाने मुंबईला पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

नव्याने सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळावरील विमानसेवेबाबत प्रवाशांच्या अपेक्षा वाढलेल्या असताना, ऐन प्रवासावेळी उद्भवलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. विमानसेवेतील अशा प्रकारांमुळे प्रवाशांच्या वेळेचे आणि नियोजनाचे नुकसान होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विमान कंपनीने योग्य खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

यावेळी प्रवासी म्हणाले, सिंधुदुर्गवरून नवी मुंबईला जाण्यासाठी फ्लाईट बुक केली होती. आमच्या फ्लाईटचा टाइम सकाळी ९:२५ मिनिटांनी होता. ९:३० वाजता आम्हाला सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून सांगण्यात आले की, आजच्या या फ्लाईटला काही तांत्रिक कारणांमुळे उशीर होईल. एक तासाचा उशीर होईल असे आम्हाला सांगण्यात आले. एक तासानंतर आम्हाला पुन्हा फ्लाईटमध्ये बोर्ड करण्यात आले. फ्लाईटमध्ये बोर्ड केल्यानंतर परत इमर्जन्सी सिच्युएशन सांगून आम्हाला क्रूने इमर्जन्सी कंडिशनमध्ये फ्लाईटमधून खाली उतरवले.

त्यानंतर एक तासाच्या नंतर असं सांगण्यात आले की तुम्हाला गोव्याच्या मोपा एअरपोर्टवरून नवी मुंबईसाठी फ्लाईट देण्यात येईल. त्यानंतर आम्हाला तिकडून बस आणि छोट्या व्हेईकल्सने मोपा एअरपोर्टला शिफ्ट करण्यात आले. मोपा एअरपोर्टला शिफ्ट करण्यात आल्यानंतर या फ्लाईटमध्ये असणारे जवळजवळ सर्वच लोक दोन तास एअरपोर्टच्या बाहेर ताटकळत उभे होते.

कोणत्याही प्रकारचे बोर्डिंग पासेस किंवा रिव्हाइज्ड तिकीट त्यांच्याजवळ नव्हते. त्यानंतर पॅसेंजर्सनी सीआयएसएफ सोबत को-ऑर्डिनेट केल्यानंतर पुढच्या सगळ्या व्यवस्था करण्यात आल्या.

सिंधुदुर्गवरून निघताना सांगण्यात आलं होतं की ही फ्लाईट २:३० वाजता मोपा एअरपोर्टवरून निघेल. पण, इथे आल्यानंतर फ्लाईट ४ वाजता निघेल असे सांगण्यात आले. त्यानंतर ४ वाजता आता असे सांगण्यात येतंय की ही फ्लाईट अजूनही हैदराबादवरून यायची आहे. ती जर आली तर मग ती इथून नवी मुंबईला जाईल.

सिंधुदुर्गात एअरपोर्ट मॅनेजरनी अल्टरनेट अरेंजमेंट करून देतो, फ्लाईट अरेंजमेंट करून देतो, तुमचे रिफ्रेशमेंट्स अरेंज करतो असे सांगितले. पण, इथे आल्यानंतरही सर्वजण ताटकळत बसून आहेत. त्यांना इथे कोणी पाणीही विचारलेलं नाही. 'फ्लाय ९१' एअरलाईन्सचे ऑफिसर्स  उडवाउडवीची उत्तरे देत आहेत अशी खंत प्रवाशांनी व्यक्त केली. तसेच फ्लाय 91 ला याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून लवकरच यावर स्पष्टीकरण दिलं जाईल असं सांगितलं आहे.


ताजी बातमी

View all

chiplun-indian-pangolin-rescue-khersheth.jpg
Chiplun Pangolin Rescue : खेरशेतमध्ये दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान
November 28, 2026
Mumbai-Goa Highway Accident : कोंडमळा येथे उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक
November 28, 2026
Karivade Maruti Temple built on a giant rock beside a river in Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra.
Karivade Maruti Temple : नदीच्या पात्रात अजस्त्र खडकावर उभं मारुती मंदिर
November 28, 2026
vedant-pophale-modern-pentathlon-state-level-selection.jpg
Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

MSRTC employees protest against privatization and outsourcing policies in Maharashtra on December 10.
MSRTC Employees Protest : एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संयुक्त कृती समितीचा एल्गार
November 28, 2026
Maharashtra primary teachers announce statewide agitation from December 1 against excessive administrative duties and pending education-related demands.
Maharashtra Primary Teachers Protest 2026 : १ डिसेंबरपासून शिक्षक प्रशासकीय व्हॉट्सऍप ग्रुपमधून बाहेर पडणार
November 28, 2026
Maharashtra CM Relief Fund Social Stock Exchange Registration
CM Relief Fund Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर
November 27, 2026
 Shiv Sena MLA Nilesh Rane addresses a press conference in Malvan and comments on Supriya Sule CM rumours and Maharashtra political issues.
Nilesh Rane : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार?
November 27, 2026