LIVE UPDATES

CM Relief Fund Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर

गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 27, 2026 08:08 PM
views 50  views
Maharashtra CM Relief Fund Social Stock Exchange Registration

मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कामकाजाला आता सोशल स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून नवी दिशा मिळू शकते. सोशल स्टॉक एक्स्चेंज हे सामाजिक आणि लोककल्याणकारी कामांसाठी निधी उभारणीचे नियमबद्ध व्यासपीठ आहे. या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पात्र संस्था आणि देणगीदार यांच्यात समन्वय साधता येतो. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या नव्या व्यासपीठाद्वारे मिळणाऱ्या अतिरिक्त मदतीचा लाभ राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी होणार आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार, यकृतविकार, मेंदूविकार तसेच अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र गेल्या काही वर्षात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदत मिळावी यासाठी अर्ज करणाऱ्या रुग्णांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  सोशल स्टॉक एक्स्चेंजमुळे अशा निधी उभारणीला व्यापक स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.

सामान्य शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर्स खरेदी-विक्री केले जातात. मात्र सोशल स्टॉक एक्स्चेंजमध्ये सामाजिक आणि लोककल्याणकारी कामांसाठी निधी उभारणी केली जाते. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) येथे सेबीच्या (एसईबीआय) नियमनाखाली हे व्यासपीठ उपलब्ध आहे.पात्र ना-नफा संस्था या व्यासपीठावर नोंदणी करून झिरो कूपन झिरो प्रिन्सिपल या माध्यमातून निधी उभारू शकतात. या माध्यमातून देणगीदारांना सामाजिक कामांसाठी योगदान देण्याची संधी मिळते.

निधी उभारणीची नवीन संधी: सामाजिक उपक्रमांसाठी देणग्या व गुंतवणुकीच्या माध्यमातून निधी मिळविण्याचा पर्याय उपलब्ध होतो.कंपन्यांच्या सामाजिक दायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीचा वापर सामाजिक कामांसाठी करण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो.

विशेषतः वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या निधीची गरज असलेल्या रुग्णांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. तसेच कर्करोग, हृदयरोग, किडनी प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मेंदूविकार आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी अतिरिक्त निधी उभारण्यास मदत होऊ शकते.

सीएसआर फंड देणाऱ्या कंपन्या, मोठे देणगीदार, फाउंडेशन, सामाजिक गुंतवणूकदार आणि इतर निधी पुरवठादार यांच्यापर्यंत पोहोचता येते. संस्थेच्या कार्याची माहिती व्यापक स्तरावर पोहोचल्यामुळे नवीन देणगीदार आणि सामाजिक क्षेत्रातील भागीदार मिळण्याची शक्यता वाढते. संस्थेने केलेल्या कामाचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, किती कुटुंबांचे जीवनमान सुधारले आणि किती सकारात्मक बदल घडले, हे मोजता येते.

मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून त्रिपक्षीय निधी उभारणी तसेच स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार अशा उपक्रमांवर काम सुरू आहे. याशिवाय गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी अतिरिक्त आर्थिक स्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी स्थापन करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीचा मुख्य उद्देश आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचे उपचार थांबवू नयेत हा आहे. सोशल स्टॉक एक्स्चेंजसारख्या निधी उभारणीच्या माध्यमातून सामाजिक सहभाग वाढविणे आणि कॉर्पोरेट क्षेत्राला जोडणे शक्य होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची नुकतीच नोंदणी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर याद्वारे मिळणाऱ्या अतिरिक्त मदतीचा लाभ दुष्काळग्रस्त भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी होणार आहे. येत्या काळात दुर्मिळ, महागड्या आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावांची नोंदणी आता या नव्या व्यासपीठावर करण्यात येणार आहे. तसेच त्यामुळे अधिक कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग वाढणार आहे, असे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.


ताजी बातमी

View all

Sawantwadi Moti Lake Pollution Fine
Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
November 27, 2026
Archana Sawant Teachers Council Appointment
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकार्यवाहपदी अर्चना सावंत यांची निवड
November 27, 2026
Teacher MLA Dnyaneshwar Mhatre meets Sindhudurg Zilla Parishad President Pramod Kamat to discuss education issues.
सिंधुदुर्गातील शिक्षकांच्या प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद अध्यक्षांशी चर्चा
November 27, 2026
Vengurla Science Exhibition 2026
Vengurla Science Exhibition 2026 : सिंधुदुर्गातून भविष्यात नामवंत शास्त्रज्ञ घडावा
November 27, 2026
संबंधित बातम्या

View all

 Shiv Sena MLA Nilesh Rane addresses a press conference in Malvan and comments on Supriya Sule CM rumours and Maharashtra political issues.
Nilesh Rane : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार?
November 27, 2026
Maharashtra Transport Minister Pratap Sarnaik announces proposed autorickshaw scheme for small and marginal farmers
महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार १ लाख रिक्षा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
November 26, 2026
NCP leader Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital in Mumbai due to suspected dehydration
Sharad Pawar : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
November 26, 2026
Traditional Deepdan and illuminated temple lamps during Tripuri Purnima celebrations at a Sateri Devi temple in Konkan.
Tripuri Purnima Significance : त्रिपुरारीच्या रात्री सातेरीचा जागर का ?
November 23, 2026