LIVE UPDATES

Maharashtra Primary Teachers Protest 2026 : १ डिसेंबरपासून शिक्षक प्रशासकीय व्हॉट्सऍप ग्रुपमधून बाहेर पडणार

‘शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या’च्या भूमिकेतून राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा आंदोलनाचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 03:37 PM
views 119  views
Maharashtra primary teachers announce statewide agitation from December 1 against excessive administrative duties and pending education-related demands.

सिंधुदुर्गनगरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ राज्यभरातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत येत्या १ डिसेंबर २०२६ पासून शिक्षक तथाकथित प्रशासकीय व्हॉट्सऍप ग्रुपमधून बाहेर पडणार असून, दैनंदिन अध्यापनात अडथळा आणणारी विविध अॅप्स आणि अनावश्यक ऑनलाइन कामे न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शालेय शिक्षण मंत्री, राज्यमंत्री तसेच संबंधित प्रशासकीय व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.  

आंदोलनामागील प्रमुख कारणे व मुद्दे खालीलप्रमाणे

संचमान्यतेचा परिणाम

सध्याच्या संचमान्यतेच्या धोरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्व धोक्यात आले असून, भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या गावातच शिक्षण घेण्याच्या संधीपासून वंचित राहावे लागण्याची व त्यातून गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.  

अध्यापनाबाहेरील कामांचा भार
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करणारा शासन निर्णय आणि शनिवार हा माहितीचा वार निश्चित करणारे परिपत्रक केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप आहे. त्याऐवजी नियमबाह्यपणे अध्यापनाशी संबंध नसलेली कामे, अनेक वर्षांपासून बी.एल.ओ.ची जबाबदारी, तसेच गुंतागुंतीची व वेळखाऊ ‘एस.एन.ए.स्पर्श ’ प्रणाली आणि विविध अॅप्स व ऑनलाइन/ऑफलाइन माहिती संकलनाचा अतिरेक सुरू आहे.  

व्हॉट्सऍप ग्रुपवरून माहितीची मागणी व मानसिक ताण
प्रशासकीय व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून वेळी-अवेळी, रात्री-अपरात्री आणि प्रत्यक्ष शिकवणे सुरू असतानाही माहिती मागवली जाते. यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा आणि मानसिक ताणाचा भार वाढत असून, अध्यापनासाठी आवश्यक वेळ व मानसिक स्वास्थ्य राखणे कठीण झाले आहे.  

प्रलंबित प्रश्न व आश्वासने
संचमान्यता, TET तसेच इतर विविध प्रश्नांवर चर्चा करून शासनाने आश्वासने दिली असली, तरी प्रत्यक्षात प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.  

आंदोलनाची रूपरेषा व भूमिका

२४ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या एकत्रित सभेत व्यापक व संघटित लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबर २०२६ पासून प्रशासकीय व्हॉट्सऍप ग्रुपमधून बाहेर पडणे आणि अध्यापन कार्यात अडथळा ठरणारी अनावश्यक ऑनलाइन कामे व अॅप्स हाताळणे बंद केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत व संवैधानिक अधिकार असून, शाळांचे अस्तित्व टिकवणे, शिक्षकांच्या न्याय्य मागण्या सोडवणे आणि त्यांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ व अनुकूल वातावरण देणे, हाच या निर्णयामागचा मुख्य हेतू असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.  

या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डायट (DIET) प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), गट विकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनाही माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

शासनाने या प्रश्नांची न्याय्य सोडवणूक करून सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी व्यक्त केली आहे.


ताजी बातमी

View all

chiplun-indian-pangolin-rescue-khersheth.jpg
Chiplun Pangolin Rescue : खेरशेतमध्ये दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान
November 28, 2026
Mumbai-Goa Highway Accident : कोंडमळा येथे उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक
November 28, 2026
Karivade Maruti Temple built on a giant rock beside a river in Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra.
Karivade Maruti Temple : नदीच्या पात्रात अजस्त्र खडकावर उभं मारुती मंदिर
November 28, 2026
vedant-pophale-modern-pentathlon-state-level-selection.jpg
Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

MSRTC employees protest against privatization and outsourcing policies in Maharashtra on December 10.
MSRTC Employees Protest : एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संयुक्त कृती समितीचा एल्गार
November 28, 2026
Fly91 aircraft at Sindhudurg Airport after a technical issue disrupted the flight to Navi Mumbai, with passengers shifted to Mopa Airport in Goa.
Sindhudurg Airport Fly91 : सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवेत तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा
November 28, 2026
Maharashtra CM Relief Fund Social Stock Exchange Registration
CM Relief Fund Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर
November 27, 2026
 Shiv Sena MLA Nilesh Rane addresses a press conference in Malvan and comments on Supriya Sule CM rumours and Maharashtra political issues.
Nilesh Rane : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार?
November 27, 2026