
चिपळूण : तालुक्यातील खेरशेत (बौद्धवाडी) येथे लोकवस्तीत आलेल्या दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला वनविभागाच्या पथकाने सुरक्षितपणे ताब्यात घेत जीवदान दिले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर या एक वर्षीय मादी पिल्लाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
खेरशेत येथील प्रताप अविनाश मोहिते यांच्या घराच्या अंगणात खवले मांजराचे पिल्लू आढळले. याबाबत स्थानिक नागरिक स्वप्निल कदम यांनी तातडीने नांदगाव येथील वनरक्षकांना माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
चिपळूणचे परिक्षेत्र वन अधिकारी एस. एस. खान, नांदगावच्या वनरक्षक अश्विनी जाधव, रामपूरचे वनरक्षक राहुल गुंठे तसेच जलद कृती दलाचे (RRT) सदस्य रितेश घाग आणि मयूर सकपाळ यांनी कौशल्याने पिल्लाला सुरक्षित ताब्यात घेतले.
त्यानंतर सावर्डे येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पिल्लू निरोगी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. ही बचाव मोहीम विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वनविभागाचे नागरिकांना आवाहन
लोकवस्तीत वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता स्वतः त्याला पकडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








