
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील विविध प्रश्न, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळांमधील भौतिक सुविधांच्या अनुषंगाने कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट होवून महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य गोट्या सावंत, माध्यमिक शिक्षणाधिकारी किंजवडेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी दिनेश म्हाडगूत,सलिम तकीलदार,सुभाष खरात,गुरुदास कुसगावकर,हनुमंत वाळके,रामचंद्र घावरे,करंजे हायस्कूल मुख्याध्यापक चौडणकर आदी उपस्थित होते.
बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावयाच्या सुविधा, शाळांच्या भौतिक गरजा तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
शिक्षक आणि शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन, जिल्हा परिषद आणि शिक्षक संघटनांमध्ये समन्वय आवश्यक असल्यावर यावेळी विचारविनिमय करण्यात आला. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सर्व संबंधित विभाग आणि शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एकत्रित बैठक घेऊन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्याच्या अनुषंगानेही चर्चा झाली.
जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना प्राधान्य देऊन शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








